क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Police News : ठाणे पोलिसांची मोठी कारवाई! वाहन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 26 गुन्हे उघडकीस

Thane Police Latest Breaking News : 28 मोटारसायकली आणि चारचाकी वाहने जप्त; पुणे, जळगावमधील आरोपींना अटक

ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोठ्या टोळीला अटक करत 26 गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 17 लाख 89 हजार रुपयांची 28 वाहने (मोटारसायकली आणि चारचाकी) हस्तगत केली आहेत. Thane Police Latest Breaking News

तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध, गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी

ठाणे पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीणमधील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती. यासाठी पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. Thane Police Latest Crime News

या तपासामुळे गुन्हे शाखा, घटक-3, कल्याण आणि घटक-2, भिवंडी यांना आरोपींचा शोध घेण्यात यश आले. पोलिसांनी पुणे, जळगाव आणि ठाणे येथील पाच आरोपींना अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे:

1.अतुल सुरेश खंडाळे (वय 24) – रा. हडपसर, पुणे

2.शेखर गोवर्धन पवार (वय 30) – रा. जळगाव

3.आकाश मच्छिंद्र नसरगंध (वय 23) – रा. कल्याण

4.गाझी लकीर हुसैन (वय 19) – रा. आंबिवली

5.मुश्ताक इस्तीयाक अंसारी (वय 31) – रा. भिवंडी

या आरोपींकडून पोलिसांनी विविध भागातून चोरलेली 28 वाहने जप्त केली आहेत. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. या अटकेमुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे.

ही प्रभावी कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0