Thane Police Latest Drug Racket Busted News : 5 कोटी 50 हजारांचा ‘चरस’ अमली पदार्थ जप्त; आरोपी पश्चिम बंगालचा, नेपाळ कनेक्शनचा संशय, गुन्हे अन्वेषण शाखेचे धागेदोरे!
ठाणे :- डिसेंबर महिन्यात आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या विविध पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांची होणारी विक्री रोखण्यासाठी ठाणे पोलिसांच्या Thane Crime Branch गुन्हे अन्वेषण शाखेने आता कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल 5 कोटी 59 हजार रुपये किमतीचा ‘चरस’ हा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नेपाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. Thane Latest Crime News
साकेत-बाळकुम मार्गावरील पाडा क्रमांक दोन येथे अमली पदार्थ घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट पाचला मिळाली होती. या माहितीनुसार, युनिट पाचच्या पथकाने तातडीने सापळा रचला. त्यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती आढळून आला.
पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 5 किलो 50 ग्रॅम वजनाचा, आंतरराष्ट्रीय बाजारात 5 कोटी 50 हजार रुपये किमतीचा चरस हा अमली पदार्थाचा साठा आढळला. आरोपीचे नाव शनवर अन्वर अली (वय 38) असून, तो पश्चिम बंगालमधील खिद्दीरपोरे येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत शनवर अलीने हे अमली पदार्थ एका नेपाळी व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या अमली पदार्थ तस्करीचे जाळे नेपाळपर्यंत विस्तारलेले असण्याची शक्यता आहे. ठाणे पोलिसांनी आता या नेपाळी व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आणि या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी तपास तीव्र केला आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…