Thane Police Latest News : व्दारली पाडा येथे बेकायदेशीर दारू तयार करणारी भट्टी उद्ध्वस्त, साडेतीन लाखांचे साहित्य हस्तगत
अंबरनाथ | ठाणे शहर गुन्हे शाखेच्या Thane Crime Branch खंडणी विरोधी पथकाने अंबरनाथमधील व्दारली पाडा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू उत्पादनाच्या अड्ड्यावर गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई केली. या छाप्यात गावठी हातभट्टी उध्वस्त करण्यात आली असून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. Thane Latest Crime News
दिनांक 3 जुलै 2025 रोजी दुपारी 1.15 वाजता जय गोलोबा चाळ समोर असलेल्या मोकळ्या मैदानात खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत आदेश पंडीत गायकर (वय 24) या आरोपीला रंगेहाथ पकडले. तो सत्संग भवनाजवळ, मलंगगड रोड, व्दारली पाडा येथे राहतो. तो गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्टीवर दारू उकळत होता.
या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 15 हजार 950 रुपये किमतीचे गावठी दारू, हातभट्टीचे साहित्य, प्लास्टिक ड्रम्स, कुंड्या, पाईप्स इत्यादी साहित्य जप्त केले. आरोपीविरुद्ध हिललाइन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत कलम 65 (ब), (क), (ई), (फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक आयुक्त शेखर बागडे, व विनायक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे, भुषण कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक तावडे, संदीप भोसले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…