Thane Police Unit 1 Seized Gun From Tadipar Criminal : बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या घटक-1 पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 2 पिस्तूल व 1 जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.
ठाणे :- बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल Deshi Pistol बाळगणाऱ्या एका तडीपार सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या घटक-1 Thane Police Unit 1 पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 2 पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. आरोपीला दोन वर्षाच्या कालावधीकरिता ठाणे, मुंबई,मुंबई उपनगर,रायगड आणि पालघर या जिल्ह्यातून हद्दपार गेले होते. Thane Tadipar Criminal राहुल उर्फ काळ्या उर्फ मोहम्मद गुलजार पिर मोहम्मद खान (23 वय,शिळ-डायघर, ठाणे) असे तडीपार आरोपीचे नाव आहे. Thane Police Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलीक यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, 2 वर्षांकरीता हद्दपार केलेला व्यक्ती त्याच्या ताब्यातील बंदूक विक्री करण्याकरीता शिळडायघर पोलीस ठाणेच्या हद्दीत येणार आहे. अशी बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलिक, पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव, पोलीस हवालदार प्रशांत निकुंभ, नंदकुमार पाटील, बालू मुकणे असे पथक तयार करून मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने शिळ फाटा, शिळ-डायघर या ठिकाणी सापळा रचून तडीपार आरोपी राहुल उर्फ काळया उर्फ मोहमद गुलजार पिर मोहमद खान, याला ताब्यात घेतले असतात त्यांची अंगझडतीत 2 देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व 1 जिवंत काडतुस मिळून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिळ-डायघर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (1), 135, 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलिक हे करीत आहेत तसेच अटक आरोपीविरुध्द यापुर्वी चार गुन्हे दाखल आहेत. Thane Police Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे (शोध-1) शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलीक, पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव, पोलीस हवालदार प्रशांत निकुंभ, नंदकुमार पाटील, बाळु मुकणे या पथकाने केली आहे. Thane Police Latest Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…