Thane Police Appeal For Vote : ठाणे पोलीस आयुक्तांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे केले आवाहन

•पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणेकरांना मतदान करण्याचे केले आवाहन
ठाणे :- राज्यात पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान अधिक प्रमाणात व्हावे याकरिता सातत्याने आवाहन करत आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मतदार राजाला आवाहन केले आहे. भिवंडी-23, कल्याण-24, ठाणे-25 या तीन मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यातील पाचवा टप्प्यातल्या मतदान होणार असून आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या आवडत्या उमेदवाराला निवडून देण्याकरिता संबंधित मतदार केंद्रात आपण मतदान लोकशाहीने दिलेला आपला हक्क आपण पार पाडावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवार 20 मे रोजी राज्यातील पाच टप्प्यातील मतदान संपन्न होणार असून, मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Ashutosh Dumbare यांनी मोठा फौज फाटा ठाणे जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल यांच्या तुकड्या ठाणे जिल्ह्यात तैनात करण्यात आले असून जवळपास 15 हजारहून अधिक पोलीस ठाणे जिल्ह्यात तैनात केलेल्या करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त, ठाणे आशुतोष डुंबरे, व्हिडिओ.