ठाणे

Thane Police All Out Operation : ठाणे पोलीस आयुक्तालयाची मोठी कारवाई ; ऑल आऊट ऑपरेशन

•ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान ठाणे पोलिसांकडून मोठ्या कारवाया

ठाणे :- 20 मे रोजी राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये मुंबई,मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, पालघर आदी ठिकाणी मतदान होणार आहे. मतदान करताना शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने शांततेत व भयमुक्त वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी शहरातील अवैध धंद्यांवर कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे पोलीस आयुक्ताने राबवलेला मिशन ऑल आऊट ऑपरेशन Thane Police All Out Operation अंतर्गत 11 मे ते 12 मे रोजी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन अंतर्गत परिमंडळ 1,2,3,4 व 5 शाखा तसेच वाहतूक शाखा मधील 315 पोलीस अधिकारी आणि 1236 पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले होते.

ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान खालील प्रमाणे कारवाई करण्यात आल्या आहे

•शस्त्र अधिनियम अंतर्गत 1 रिव्हॉल्वर, 3 गावठी कट्टे, 4 कोयते, 11 सुरै व 1 इतर हत्यारे असे एकुण 19 हत्यारे हस्तगत करून वेगवेगळया पोलीस ठाण्यात 19 गुन्हे दाखल करून एकूण 14 गुन्हेगारांना अटक करण्यात आली.

अवैध दारूचे एकुण 67 गुन्हे दाखल करून रू. 2 लाख 62 हजार 10 ची अवैध दारू जप्त करून एकुण 46 आरोपींवर कारवाई करण्यात आली.

तंबाखूजन्य पदार्थाच्या अनुषंगाने कोटपा कायदयान्चये 136 जणांवर कारवाई करण्यात आली.

सदर ऑपरेशन दरम्यान 188 हॉटेल, 182 लॉज, 100 बियर बार, 52 डान्स बार व इतर 07

आस्थापनांची तपासणी कारवाई करण्यात आली.

रेकॉर्डवरील 267 हिस्ट्रीशिटर, 166 तडीपार, 172 गुंड असे एकुण 605 सराईत गुन्हेगार यांची

तपासणी करून झाडाझडती घेण्यात आली, त्यावेळी 20 तडीपार गुंड मिळून आल्याने त्यांचेविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.

अंमलीपदार्थ विरोधी कारवाईचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्या कारवाईत अंमलीपदार्थ सेवन करणाऱ्या एकुण 40 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली.

सदर ऑपरेशन दरम्याम 72 हजार 450 रू. किंमतीचे अवैध शस्त्र व 2 लाख 62 हजार 10 रू. किंमतीची अवैध दारू असा एकुण 3 लाख 34 हजार 460 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठाणे पोलीस आयुक्तालयात वाहतूक शाखेकडून एकुण 1798 लहान/मोठे वाहने तपासण्यात आली. दरम्यान मोटर वाहन कायदयान्वये 791 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून रू.6 लाख 85 हजार 450 रुपये चा दंड आकारण्यात आला आहे. पोलिसांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारे कारवाईचे बडगा उभारला आहे. शहरांमध्ये अतिरिक्त पोलीस फोर्स तळण्यात करण्यात आली आहे तसेच मतदानाच्या दिवशी पोलिसांकडून काटेकोरपणे बंदोबस्त पाळण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0