Thane Online Scam : महिलेने ऑनलाईन ऑर्डर रद्द केली, पैसे परत मिळवताना बँक खात्यातून 5.05 लाख गमावले
•ऑनलाईन फसवणूक ; ऑर्डर रद्द केली, पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले असता बँक खात्यातून 5.05 लाख गमविले, मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
ठाणे :- आनंद कोळीवाडा, मुंब्रा येथे राहणाऱ्या 51 वर्षीय महिलेची पाच लाख पाच हजार रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. महिलेने ऑनलाईन शॉपिंग केली होती. परंतु ती ऑर्डर रद्द केली आणि ऑनलाईन भरलेले पैसे परत मिळवण्यासाठी महिलेला ऑनलाईन पाच लाख पाच हजार रुपयांचा भुर्दंड पडला आहे. महिलेची आर्थिक फसवणूक झाल्याने महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मे च्या दरम्यान आनंद कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या एका 51 वर्षीय महिलेने रद्द केलेला ऑर्डर चे पैसे परत करण्याच्या बहाण्याने शॉपसी कंपनीच्या व्यक्ती बोलत असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून एकूण पाच लाख पाच हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली होती. महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयातील पुढील तपास पोलीस निरीक्षक पगार हे करत आहे.