Thane Breaking News : शिंदेंचा बालेकिल्ला अभेद्य राहणार की ठाकरे-मनसेची युती मुसंडी मारणार?
ठाणे | ठाणे महानगरपालिकेच्या Thane BMC News ३३ प्रभागांमधील १३१ जागांसाठी आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण ११ विभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडत आहे. ६४१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज स्पष्ट होणार असून, पहिल्या फेरीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे.
११ केंद्रांवर मतमोजणीचे नियोजन
मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने ११ केंद्रांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त असून उमेदवारांच्या प्रतिनिधींना तपासणीनंतरच आत प्रवेश दिला जात आहे. या ११ केंद्रांच्या माध्यमातून १३१ जागांचे निकाल साधारणतः दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरणे आणि प्रतिष्ठा
एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा: ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने 3 उमेदवार बिनविरोध निवडून आणत विजयाचे खाते आधीच उघडले आहे.
ठाकरे-मनसे युती: मुंबईप्रमाणे ठाण्यातही राज आणि उद्धव ठाकरे यांची युती महत्त्वाची मानली जात आहे. शिंदेंच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी या युतीने मोठी ताकद लावली आहे.
भाजपची भूमिका: भाजप आणि शिंदे गट युतीने निवडणूक लढवली असली, तरी जागावाटपावरून काही ठिकाणी अंतर्गत नाराजी होती. ही नाराजी निकालावर काय परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मतदानाचा टक्का आणि निकालावर परिणाम
यंदा ५५.५९ टक्के मतदान झाले असून २०१७ मध्ये हेच प्रमाण ५८.०८ टक्के होते. मतदानाचा टक्का घसरल्याने हा फटका नेमका सत्ताधाऱ्यांना बसतो की विरोधकांना, यावर सध्या चर्चा रंगली आहे. नऊ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने ठाणेकरांनी कुणाला कौल दिला आहे, याची धाकधूक सर्वच पक्षांच्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळत आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…