Thane Latest Mobile Robbery News : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील रहिवाशांना 1.97 लाख रुपयांचे फोन मिळाले; नागरिकांना गहाळ फोनची माहिती CEIR पोर्टलवर देण्याचे आवाहन
ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत गहाळ झालेले 15 विविध कंपन्यांचे मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या 15 मोबाईल फोनची एकूण किंमत 1 लाख 97 हजार 589 रुपये आहे. Thane Latest Crime News
खंडणी विरोधी पथकाने विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मिसिंग मोबाईल फोनच्या तक्रारींचा मागोवा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) ॲप्लिकेशनचा वापर केला. https://ceir.gov.in या संकेतस्थळाच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक तपासणी करून हे मोबाईल फोन हस्तगत केले.
हस्तगत केलेले सर्व 15 मोबाईल फोन दि.6 डिसेंबर रोजी त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
नागरिकांना आवाहन
ठाणे पोलीस आयुक्तालयअंतर्गत येणाऱ्या ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील रहिवाशांना पोलिसांनी आवाहन केले आहे. जर कोणाचे मोबाईल फोन चोरीस गेले असतील किंवा गहाळ झाले असतील, तर त्यांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि https://ceir.gov.in या संकेतस्थळावर त्याची माहिती अपलोड करावी.
गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी व त्यांच्या टीमने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…