क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane News : “घरातून निघालेली ती परतच आली नाही… पण तिच्या गायब होण्यामागचं रहस्य अखेर उघड!”

Thane Latest Crime News : ठाणेतील अल्पवयीन मुलीच्या खुनप्रकरणी धक्कादायक उलगडा – रिक्षाचालकानेच केली ‘त्या’ चिमुकलीची हत्या? वागळे क्राईम ब्रँचचा शिताफीने छडा!

ठाणे | एका अल्पवयीन मुलीचा बेपत्ता होण्याचा गुन्हा, एका थरारक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या खुनात कधी बदलला, याचा पत्ता तिच्या कुटुंबियांनाही लागला नाही… पण ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट-5 Thane Police Wagle Unit 5 ने याचा गुन्ह्याच्या पाताळात जाऊन तपास करत अखेर खून प्रकरणातील मुख्य आरोपीला जेरबंद केलं आहे. Thane Latest Crime News

घरातून निघालेली ती, अखेर रिक्षातून थेट मृत्यूकडे…

4 जुलै 2025 रोजी एका अल्पवयीन मुलीने घर सोडले आणि ती परतच आली नाही. पुढील दिवशी तिच्या अपहरणाचा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात कलम 137(2), भा.न्या.सं. 2023 दाखल करण्यात आला.
अवघ्या काही तासांतच कासारवडवली पोलीस ठाण्यात तिच्या खुनाचा गुन्हा कलम 103, 238, भा.न्या.सं.2023 नोंद झाला आणि संपूर्ण शहर हादरलं.

CCTV फूटेज आणि तांत्रिक तपासाचा थरार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या नेतृत्वाखाली सपोनि शरद पाटील व पथकाने घटनास्थळानजीकच्या सर्व CCTV फुटेज बारकाईने तपासले. त्यात मुलगी ठाणे रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा स्टँडमध्ये एका रिक्षात बसलेली दिसली.त्यातून तपासाची दिशा ठरली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे या रिक्षाचा माग काढताच समाधान अर्जुन सुर्यवंशी (वय 40) या रिक्षाचालकावर संशय बळावला. 10 जुलै 2025 रोजी त्यास गुप्त सापळ्यातून ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून, ही अल्पवयीन मुलगी फसवून, बहाण्याने रिक्षात बसवण्यात आली आणि… तिची निर्दयी हत्या करण्यात आली, असा अंदाज आहे.
पोलीस अजूनही हत्या कशी आणि कुठे झाली, इतर कोण सहभागी होते का? याचा सखोल तपास करत आहेत.

पोलीस पथक

डॉ. पंजाबराव उगले अपर पोलीस आयुक्त,अमरसिंह जाधव पोलीस उप आयुक्त (गुन्हे),शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे, शोध 1),सलील भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक, क्राईम ब्रँच युनिट-5 तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, शरद पाटील, भुषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, तसेच 30 हून अधिक अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0