
Thane Shiv Jayanti Utsav 2025 : विवेक जगताप महाराष्ट्र मिरर संपादक आणि भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांचे प्रमुख उपस्थिती
ठाणे :- राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. Thane Shiv Jayanti Utsav 2025 ठाणे जिल्ह्यात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात समाजाभिमुख उपक्रम आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. यंदाही वारणा प्रतिष्ठान यांनी ज्ञानसाधना कॉलेज साठेवाडी येथे आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्था आणि भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विवेक जगताप Vivek Jagtap यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. डी आर जाधव (आण्णा) भारतीय कुस्ती महासंघ, वरिष्ठ उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत विवेक जाधव आणि चंद्रकांत पाटील यांनी विवेक जगताप स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विवेक जगताप यांनी अभिवादन केले. Thane Latest News
ठाणे महानगरपालिकेतर्फे सोमवार, 17 मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक तलाव पाळी, टेंभी नाका, कोर्ट नाका, स्टेशन रस्ता, सिद्धिविनायक मंदिर, रंगो बापूजी गुप्ते चौक या मार्गावर निघाली.मिरवणुकीत, घोडेस्वार, लेझीम पथक, शिवकालीन खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणारी पथके, बॅण्ड आदीचा समावेश होता. Thane Latest News