•पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप; ठाणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल
ठाणे | मुंबईतील नौदल गोदीसारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्राची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप झेलणाऱ्या रवी वर्मा याने गुरुवारी जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वर्माच्या अर्जावर तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालय निर्णय देणार आहे.
कळवा परिसरात राहणारा रवी वर्मा हा एका खासगी कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता. ही कंपनी मुंबईतील नौदलाच्या गोदीत सेवा पुरवत असल्यामुळे वर्म्याला तेथे नियमित प्रवेश होता. तपासात स्पष्ट झाले की त्याच्याकडे गोदीचे नकाशे व छायाचित्रे होती, आणि ती माहिती त्याने एका तरुणीच्या माध्यमातून पाकिस्तानकडे लीक केल्याचा आरोप आहे.
रवी वर्मा सोशल मीडियावरील ‘हनीट्रॅप’चा बळी ठरला असावा, अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दहशतवादविरोधी पथकाने (ATS) त्याला अटक केली होती आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
वकील राजहंस गिरासे यांच्या माध्यमातून वर्म्याने ठाणे न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जामिनासाठी अर्ज केला असून, सरकारी वकिलांचे म्हणणे आणि तपासी अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतरच पुढील सुनावणी होणार आहे.
हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असल्यामुळे प्रकरण अत्यंत संवेदनशील मानले जात असून, एटीएसकडून त्याच्या संपर्कातील इतर व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…