•सोनू पाल व गणेश शिंदे यांना रंगेहाथ अटक, संघटनेचा वापर करून दहशत निर्माण केल्याचा आरोप
ठाणे | ठाणे अँटी-एक्सटॉर्शन सेलने मोठी कामगिरी करत खंडणीप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. हे दोघे सोनू पाल आणि गणेश शिंदे असून, गणेश शिंदे हे माथाडी कामगार संघटनेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपींनी एका व्यक्तीकडून 10 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडलं.
ही कारवाई ठाण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कारवायांवर पोलिसांनी दिलेला आणखी एक ठोस दणका मानला जात आहे. या प्रकरणामुळे माथाडी संघटनेच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून, या कारवाईने राजकीय आणि कामगार वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कसे उघडकीस आले प्रकरण?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनू पाल आणि गणेश शिंदे यांनी एका व्यावसायिकाला धमकी देत त्याच्याकडून 10 लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी पीडित व्यक्तीने थेट अँटी-एक्सटॉर्शन सेलशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचत ठरलेल्या ठिकाणी कारवाई करत आरोपींना पैसे स्वीकारताना अटक केली.
संघटनेच्या नावाचा गैरवापर?
गणेश शिंदे हे स्वत:ला माथाडी संघटनेशी संबंधित असल्याचं भासवत व्यावसायिकांवर दबाव टाकत होते. त्यांच्या या वर्तनामुळे कामगार संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली असून, संघटनेच्या विश्वासार्हतेवर गालबोट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या अँटी-एक्सटॉर्शन सेल अधिक तपास करत आहे. पोलिस हेही तपास करत आहेत की, यामागे आणखी कोणी मोठे मासे कार्यरत आहेत का. आरोपींनी आधीही अशा प्रकारच्या खंडणी वसूल केल्या आहेत का, याबाबतही तपास सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…