महाराष्ट्र
Trending

Thane News : मुंब्रा रेतीबंदर खाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ!

Thane Latest Crime News : पोलीस व अग्निशमन दलाने केले रेस्क्यू; मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यात पाठवला

ठाणे | मुंब्रा परिसरातील पारसिक – रेतीबंदर खाडीत बुधवारी दुपारी 37 वर्षीय हाद्रतअली शेख यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही बाब समोर येताच मुंब्रा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदनासाठी मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. Thane Latest Crime News

ही घटना बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पारसिक रेतीबंदर खाडीच्या किनाऱ्यावर एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, तसेच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवून मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला.

मृत व्यक्तीची ओळख हाद्रतअली हसन शेख (37 वय, रा. संजय नगर, मुंब्रा) अशी पटली असून, प्राथमिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तो अपघाती, घातपात की आत्महत्या याचा निर्णय शवविच्छेदन अहवालानंतर होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.घटनेच्या नोंदीनंतर मुंब्रा पोलीस पुढील Mumbra Police Station तपास करत असून, खाडीत मृतदेह सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची स्थानिक नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0