•ठाणे शहरातील धक्कादायक प्रकार; विधानसभा निवडणुकीत मतदान करूनही मुंब्रा भागातील नगरसेवकाला फटका; दुबार-तिबार नोंदीचा घोळ कायम
ठाणे :- राज्यातील मतदार याद्यांमधील गोंधळाचे आणि घोळाचे प्रकार काही केल्या थांबायला तयार नाहीत. कुठे दुबार-तिबार मतदारांची नोंदणी आढळते, तर कुठे मतदारांचा पत्ता किंवा तालुका बदलला जातो. या सगळ्या भोंगळ कारभाराचा फटका आता ठाणे शहरातील एका माजी नगरसेवकाला बसला आहे.मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक सुधीर भगत यांचे नाव नगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम झालेल्या यादीतून वगळल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
माजी नगरसेवकाचे नाव वगळले
माजी नगरसेवक सुधीर भगत यांना जेव्हा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांचे नाव ऑनलाइन यादीत तपासले, तेव्हा ते वगळले गेल्याचे निदर्शनास आले.
तक्रार: भगत यांनी त्वरित निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, गतवर्षीच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी याच प्रभागातून मतदानाचा हक्क बजावला होता.
चूक मान्य: चौकशीअंती जिल्हा प्रशासनाने अखेर अनावधानाने सुधीर भगत यांचे नाव वगळण्यात आल्याचे मान्य केले आहे.
वगळणीतील गैरप्रकार: भगत यांनी केलेल्या चौकशीत त्यांचे नाव मार्च 2025 मध्ये वगळल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, वगळणीसाठी सादर केलेला नमुना क्र. 7 अर्जावरील स्वाक्षरी भगत यांची नसून त्रयस्त व्यक्तीने अर्ज दाखल करून वगळणी केल्याचे समोर आले आहे. तसेच, नाव वगळण्यापूर्वी त्यांना कोणतीही सूचना किंवा म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली नव्हती.
सुधीर भगत हे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी कुटुंबीयांसह 70-75 वर्षांपासून राहत असून, ते भागातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांच्यासारख्या जागरूक व्यक्तीच्या नावाबाबत इतका मोठा घोळ झाल्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…