क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane News : येऊरच्या जंगलात ‘बर्थडे धमाका’चा गुन्हा!

Thane Police Arrested Criminal : पर्यावरणसंवेदनशील क्षेत्रात नियमबाह्य पार्टी; फटाके, डीजे आणि धिंगाण्यामुळे पोलिसात गुन्हा

ठाणे :- पर्यावरणसंवेदनशील आणि वन्यजीव क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या येऊरच्या जंगलात वाढदिवस साजरा करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. नियमांचा भंग करत फटाके, लाऊडस्पीकर आणि पार्टीचं आयोजन केल्याप्रकरणी अमरिश ठाणेकर (रा. कोपरी, ठाणे) याच्यावर वर्तकनगर पोलिस ठाण्यात Vartak Nagar Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Latest Crime News

घटना शुक्रवारी घडली असून अमरिशने येऊर जंगलातील एका फार्महाऊसवर वाढदिवस साजरा करताना फटाके फोडले, मोठ्या आवाजात डीजे लावला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे परिसरात वन्यजीवांना त्रास झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

येऊर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असून, पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या या परिसरात कोणतीही ध्वनीप्रदूषणजन्य किंवा वन्यजीवांना त्रासदायक कृती करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, धाबे आणि फार्महाऊसवर सुरू असलेल्या रात्रीच्या पार्टीकल्चरला वनविभाग व महापालिकेची अप्रत्यक्ष मुभा असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.

त्यांच्या वक्तव्यांनंतर या प्रकारावर राजकीय पातळीवरही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. परिणामी, प्रशासनाने हालचाली सुरू करत अनधिकृत पार्टी आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0