मुंबई

Thane News : गुन्हे शाखेचा ठाण्यात हाय प्रोफाईल ‘सेक्स रॅकेट’वर छापा

•घोडबंदर रोडवरील ‘द वेव्हज् कॅफे’ जवळ सापळा; वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलाल महिलेला अटक, दोन पीडित मुलींची सुटका

ठाणे :- गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम येथे अत्यंत धाडसी कारवाई करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका दलाल महिला आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे ठाणे शहरातील एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, दोन असहाय्य मुलींची तावडीतून सुटका करण्यात आली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना काल (10 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, बाईक सुरज प्लाझा, साईबाबा विहार कॉम्प्लेक्स, द वेव्हज् कॅफे, आनंदनगर, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम या उच्चभ्रू परिसरात एक दलाल महिला असहाय्य मुलींना फुस लावून वेश्यागमनासाठी बोलवणार होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस पथकाने तातडीने सापळा रचला. पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत, संबंधित दलाल महिलेस त्वरित ताब्यात घेतले. यावेळी तिच्या रखवालीत असलेल्या दोन पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली.

या प्रकाराबाबत दलाल महिला आरोपीविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 143(1), 143(3), 3(5) सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन 1956 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या महिला आरोपीची कसून चौकशी सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

सदरची यशस्वी कारवाई अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), आणि रविंद दौंडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वालगुडे, आणि इतर अंमलदारांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

31 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago