•ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत उघड नाराजी; गणेश नाईक विरुद्ध नरेश म्हस्के वाकयुद्ध कायम
ठाणे :- आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुका महायुतीतील दोन प्रमुख पक्षांसाठी म्हणजेच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वाकयुद्धामुळे दोन्ही पक्षांनी आता ‘स्वबळाची’ चाचपणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
भाजपचे शिबीर, शिंदे गटात ‘राडा’
भाजपची चाचपणी: ठाणे महापालिकेच्या एकूण 33 प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी भाजपने आज (गुरुवारी) मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून भाजपने एकप्रकारे ‘स्वबळावर’ लढण्याची तयारी आणि इच्छुकांची चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे.
शिंदे गटाचा आग्रह याच शिबिराच्या एक दिवस आधी, ठाण्यातील आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा तीव्र आग्रह धरला.
भाजपबाबत नाराजीचा सूर
या बैठकीत भाजपबाबत उघडपणे नाराजीचा सूर उमटला. ठाण्यातील शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या विकासकामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी व्यक्त केल्या. खासदार नरेश म्हस्के यांनी मात्र यावेळी नाराज नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांनी एकत्र राहून संघटन बळकट ठेवण्याचे आवाहन केले.
नेत्यांचे वाकयुद्ध
जिल्ह्यात भाजपचे आमदार आणि नेते गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के हे नाईकांच्या टीकेला सातत्याने प्रत्युत्तर देत आहेत.
दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी, “ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, हीच आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आमचीही हीच भूमिका कायम राहील,” असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव अधिक वाढला आहे.
या सर्व घडामोडी पाहता, ठाणे जिल्ह्यातील पालिका निवडणुका भाजप आणि शिंदे गट महायुतीत एकत्र लढणार की, दोघेही स्वबळावर मैदानात उतरणार, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…