ठाणे

Thane News : ठाण्यातून मोठी राजकीय घडामोड – विवेक वसंत जाधव यांची भाजपा कामगार मोर्चा, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

ठाणे : भाजपा कामगार मोर्चा, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस ( कामगार व चित्रपट आघाडी ) विवेक राजेंद्र जगताप ( Vivek Rajendra Jagtap) यांच्या सहकार्याने ठाण्यातून एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. सामाजिक भान आणि कामगार हितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या विवेक वसंत जाधव ( Vivek Vasant Jadhav )यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा, महाराष्ट्र राज्य – उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कामगारांच्या हक्कांसाठी विविध पातळ्यांवर लढा देणे, कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न आणि संघटनात्मक कार्यात दाखवलेली निष्ठा याचा सर्वसमावेशक विचार करून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

भाजपा कामगार मोर्चा, महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांगण्यात आले की, जाधव यांच्या नियुक्तीमुळे कामगार संघटनांच्या बळकटीकरणाला नवी गती मिळेल आणि राज्यभर कामगारवर्गाशी संपर्क वाढविण्यास मदत होईल.

या नियुक्तीमुळे ठाणे तसेच राज्यातील कामगार राजकारणात सकारात्मक बदलाची नवी आशा निर्माण झाली आहे.

vivek

Recent Posts