Thane Murder News : अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून, 24 तासांत खुनाचा उलगडा; किरकोळ वादातून हत्या

•Thane Crime News कळवा येथील मोबाईल चोराला रंगेहाथ पकडल्यामुळे हत्येचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उलगडा केला आहे.
ठाणे :- कळवा विभागातील तिनही पोलीस ठाणे हद्दीतील तीन वेगवेगळ्या खुनांचे गुन्हे 24 तासांचे आत उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे. पोलिसांनी तिन्ही खुनाच्या प्रकरणातील आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. तर अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राने खुन केला आहे. तर तिसऱ्या प्रकरणात मोबाईल चोराला रंगेहाथ पकडल्याने संबंधित व्यक्तीवर मोबाईल चोराने ब्लेडने वार करून त्याला जीवे ठार केल्याच्या आरोपाखाली आरोपीला अटक केली आहे.

कळवा पोलिसांनी तिन्ही खुनाचा केला उलगडा
1) 7 मार्च सकाळच्या सुमारास कळवा पोलीस ठाणे येथे खबर मिळाली कि, विटावा बस स्टॉपचे मागे सार्वजनिक कार्यक्रमाचे मोकळया स्टेजवर भिश्वेकरी (भिकारी)राहतात. तेथे एका व्यक्तीचे डोक्यात दगड घालुन त्यास ठार केले आहे. त्यावरून सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर व त्यांचे पथकाने घटनास्थळास भेट दिली. अधिका-यांची तीन पथके स्थापन करून तपासाच्या सुचना दिल्या. सर्वप्रथम पोलिसांनी मयत अनोळखी होता त्याची ओळख पटविण्यात आली असता त्याचे नाव अनिल बेहरा (वय अंदाजे 35, मुळ रा.झारखंड ) असे समजले त्यानंतर आजुबाजूने सीसीटीव्ही, गोपनिय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळे यांचे पथकाने त्या परिसरातून संतोष महादेव लाड, (वय 41 वर्ष गृह. विटावा, कळवा) त्याला ताब्यात घेवून त्याचेकडे कसून तपास केला असता. त्याने वैयक्तिक भांडणमधे रागाचे भरात अनिल बेहरा याचे डोक्यात सिमेंट कॉकिटचा दगड मारून त्याची हत्त्या केल्याची कबुली दिली.
2) 11 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास कालसेकर हॉस्पिटल मुंब्रा येवुन पोलिसांना माहिती मिळाली होती की झाकिर शहादत मोल्ला (वय 39 रा. खान कंपाउंड, शिळफाट ) याचा गळा चिरल्याने त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे तसेच घातपात असल्याने पोलिसांना त्याचा तपास केला. त्यावरून सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यानी रूग्णालयास व घटनास्थळास भेट देवून तपासाकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक लामखडे, राजपूत व इतर एक अशी तीन पथके तयार करून त्यांना सुचना देवून रवाना केले. तपासामध्ये समजले की, मयत व आरोपी तसेच त्यांचे मैत्रिण हे पश्चिम बंगाल येथील असून जे मिळेल ते मंजुरी काम करतात. प्रिय मंडल व आरोपी अश्रफुल रूस्तम मोल्ला (वय 34) याचे प्रेमसंबंध होते. मयत शाकिर मोल्ला याचे प्रिया हिचेशी अनैतिक संबंध असल्याचे संशयातून अश्रफुल मोल्ला याने 11 मार्च रोजी सायंकाळीच्या सुमारास घरामध्ये झाकिर यास दारू पाजुन तो झोपल्यावर त्याचा गळा चिरून फरार झाला होता. तांत्रिक विश्लेषण व अथक परिश्रम घेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत, लामखडे व त्यांचे पथकाने त्यास कल्याण रेल्वे स्टेशन येथुन ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. अशाप्रकारे खुनाचा गुन्हा 24 तासांचे आत उघडकीस आणण्यात आला आहे.
3) 12 मार्च रोजी मुंब्रा पोलीस ठाणेस सायन रूग्णालय येथुन माहिती प्राप्त झाला कि, मोहम्मद राहुल अजिम राईन (वय 25) याचे गळयावर दुखापत झाल्याने त्यास प्रथम छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय, कळवा व नंतर सायन रूग्णालय येथे औषधोपचारकामी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. त्यावरून त्याचा भाऊ मोहम्मद अबरार अजिव राईन (वय 28) यानी फिर्याद नोंद करून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला, त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी पोलीस निरीक्षक दवणे यांचे अधिपत्याखाली दोन पोलीस असे पथके नेमुन परिसरातील सीसीटिव्ही व गोपनिय माहितीचे विश्लेषण करून तपास केला असता त्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंभार यांचे पथकाने सादिक इसाक सय्यद (वय 19 रा. राह देवरीपाडा, मुंब्रा बायपास ) यास ताब्यात घेवून त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने कबुल केले की, 10 मार्च रोजी रात्रीचे सुमारास त्याने मयत तसेच त्यांचे आजुबाजुचे घरातून 4-5 मोबाईल चोरी केले होते. ते मयतास समजलयाने मयत त्याचा मोबाईल घेवून जाण्यास आला असता त्यांचेमध्ये झटापट होवून त्यात आरोपीने त्याचेकडील कटर सारख्या हत्याराने मोहम्मद राहुल याचे गळयावर वार करून तेथून पळून जावून विविध ठिकाणी लपत होता. अशाप्रकारे गोपनिय माहिती व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे खुनाचे गुन्हयातील आरोपीतांस 24 तासांचे आत अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, अशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुत, ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, विनायक देशमुख , पोलीस उप आयुक्त, सुभाष बुरसे , सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्त्तेकर व पथक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे व पथक तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व पथक यांनी यशस्विरित्या पार पाडली आहे.