क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Murder News : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली गळा दाबून पत्नीची हत्या ! भांडणात पतीचा राग अनावर

Thane Police Arrested Murder : पोलिसांनी आरोपी पतीला अवघ्या 24 तासात अटक केली ; चारित्र्यावरील संशय ठरलं पत्नीच्या मृत्यूचे कारण

ठाणे :- पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने गळा दाबून हत्या केल्याची घटना ठाण्यात Thane Murder News घडली आहे. घटना घडल्यानंतर फिर्यादी साहेबराव विठ्ठल दुधमल (52 वय) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात Nawpada Police Station भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती हा फरार झाला होता. पोलिसांनी आरोपी पतीला अवघ्या 24 तासाच्या आत अटक केली आहे. Thane Latest Murder News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती भास्कर नारायण सदावर्ते (30‌ वय, रा. सिद्धेश्वर तलावाजवळ ठाणे पश्चिम) मयत पत्नी प्रमिला भास्कर सदावर्ते (27 वय रा. सिद्धेश्वर तलाव ठाणे पश्चिम) या दोघा पती-पत्नीचे अनेक वेळा भांडण व्हायचे. परंतु 8 ऑक्टोंबर च्या पहाटे पती-पत्नी यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून भांडण झाले. त्या भांडणाच्या रागात पती याने पत्नीचा गळा दाबून तिला ठार मारले. आणि त्यानंतर तिथून पती फरार झाला. या संदर्भात साहेबराव दुधमल यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक गुन्हे कुंभार यांनी घटनास्थळी पाहणी करून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने तपास चालू केला. Thane Latest Murder News

कसारा रेल्वे रुळावरून पळून जाताना आरोपीच्या आवळल्या मुसक्या

गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईक आणि कामाच्या ठिकाणी शोध घेतला. आरोपी हा बस चालक असून पोलिसांनी तो चालवत असलेल्या सर्व बस चालकाचे तपासणी केली. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल नंबर बंद चालू येत असल्यामुळे संपर्क केला असता त्याचे वारंवार तो आपला ठाव ठिकाण बदलत होता. त्यामुळे पोलिसांना कोणतीही माहिती मिळत नव्हते. आरोपी च्या मोबाईल नंबर वरून पोलिसांनी आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता आरोपी हा नांदेडला त्याच्या गावी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे दोन पथक नांदेड साठी रवाना झाले त्यामधील एक पथक कारणे तर दुसरे पदक रेल्वेने नांदेडच्या दिशेने निघाली असता आरोपी हा कसारा रेल्वे स्थानकात उतरला असल्याची खात्रीदायक माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कसारा रेल्वे स्थानक परिसरात आपला सापळा रचला असता रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्मच्या आजूबाजूने परिसरात आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा ट्रॅकवरून पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 12 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार हे करत आहे. Thane Latest Murder News

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

पोलीस पथक

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, Thane CP Ashutosh Dumbare सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रा. विभाग विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01 सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली मंगेश भांगे, सहायक पोलीस निरीक्षक, मेहबुब मकानदार, पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार राजेंद्र गायकवाड, साहेबराव पाटील, विलास देसाई,सचिन रांजणे, ईश्वर गोलवड, मेहरबान तडवी पोलीस नाईक समाधान माळी, पोलीस शिपाई सारंग कांगणे,गंगाधर तिर्थकर, यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0