Thane Murder News : जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; दिराने केले वहिनी वर चाकूने वार
Ulhasnagar Crime News : उल्हासनगर मध्ये वडिलोपार्जित संपत्तीवरून दिरानेच केले वहिनीवर चाकूने वार
उल्हासनगर :- संपत्तीवरून नात्या-नात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद-विवाद होताना दिसत असतात. संपत्तीच्या वरून अनेक वेळा कौटुंबिक वाद निर्माण होऊन हे वाट टोकाला जात कौटुंबिक वाद न्यायालयात जाऊन पोहोचत असतो. उल्हासनगर मध्ये कौटुंबिक वादातूनच दिराने आपल्या वहिनीवर चाकूने हल्ला करून Stab with weapon जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याचे कारण होते ते म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती. Thane Murder News
आरोपी प्रकाश तुलसीदास भाटीया (66 वर्षे) (रा.उल्हासनगर-2) याने त्याची वहीनी महिला (66 वर्षे) (रा.उल्हासनगर-2 ) हिस वडिलोपार्जीत मालमत्ता संदर्भातील झालेल्या वादाचा राग मनात धरून त्यांचे पोटात व हातावर चाकु खुपसुन गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाराबाबत फिर्यादी प्रकाश हरेश मुलचंदानी (42 वर्षे) (रा.उल्हासनगर-2) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द भा.दं.वि. कलम 307,506 (2), सह म.पो.का कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पत्रे हे करीत आहेत. Thane Murder News