ठाणे

Thane Mayor : ठाण्यावर पुन्हा एकदा ‘भगवा’! शर्मिला पिंपळोलकर महापौर, तर कृष्णा पाटील उपमहापौर; 3 वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात

Thane Mayor Latest News : ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर ठाणे पालिकेत जल्लोष; बिनविरोध निवडीनंतर भव्य मिरवणूक

ठाणे | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महानगरपालिकेवर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने (शिंदे गट) आपले वर्चस्व कायम राखले आहे. मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची, तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसोबतच गेल्या 3 वर्षे 10 महिन्यांपासून ठाणे पालिकेत सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता लोकनियुक्त कारभाराला सुरुवात झाली आहे.

भगवे फेटे अन् फुगड्यांचा फेर; पालिका मुख्यालय दुमदुमले

नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या स्वागतासाठी ठाणे महापालिका मुख्यालय एखाद्या उत्सवासारखे नटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि महापौर दालन विविध फुलांनी सजविण्यात आले होते. शिवसेनेचे 75 आणि भाजपचे 28 अशा भक्कम संख्याबळामुळे कोणाचेही आव्हान उरले नव्हते. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून या बिनविरोध निवडीची घोषणा करताच संपूर्ण परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दोन्ही पक्षांच्या नगरसेवक आणि नगरसेविकांनी भगवे फेटे परिधान करून एकच जल्लोष केला.

शिवरायांचा पुतळा अन् लेझीम पथकाचे आकर्षण

महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते, ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरील पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या ठिकाणी महिला लेझीम पथकाने केलेल्या सादरीकरणाने आणि ब्रासबँडच्या वादनाने उत्साहात भर घातली. अनेक महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून आपला आनंद व्यक्त केला. निवडीनंतर महापौर पिंपळोलकर आणि उपमहापौर पाटील यांची ढोल-ताशांच्या गजरात एकत्रित मिरवणूक काढण्यात आली.

ठाणे महापालिकेचे नवीन समीकरण
131 सदस्यांच्या ठाणे महापालिकेत मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेने 75 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. महायुती धर्माचे पालन करत भाजपने उपमहापौर पदावर आपला दावा सिद्ध केला. विरोधी बाकांवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) 12 जागांसह सर्वात मोठा विरोधी पक्ष असेल, तर ठाकरे सेनेला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago