
Thane Latest News : 31 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता दौडीला प्रारंभ; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
ठाणे :- भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल Sardar Vallabh Bhai Patel यांची 150 वी जयंती निमित्त संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा होत आहे. याच अनुषंगाने ठाणे शहरात दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता ठाणे पोलीस दलाकडून ‘एकता दौड’ (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात आले आहे. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी ही विशेष दौड आयोजित केली जात आहे.
या राष्ट्रीय उपक्रमात ठाण्यातील सर्व नागरिकांनी, पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दौडीचा मार्ग आणि वेळ
इच्छुक नागरिकांनी दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.45 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, तलावपाळी, ठाणे येथे उपस्थित राहावे.
एकता दौड छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथून सुरू होईल. दौडीचा मार्ग असा असेल: मुस चौक उजवी बाजू, साईकृपा हॉटेल, गडकरी रंगायतन सर्कल उजवी बाजू, परफेक्ट ड्रायव्हिंग स्कूल, सेंटॉन हायस्कूल, चिंतामणी ज्वेलर्स चौक आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथे दौड समाप्त होईल.


