Thane Kidnaping News : पाच महिन्याच्या बाळाचे अपहरण,चार तासात पोलिसांकडून शोध, बाळ आईकडे सुपूर्त
Thane Kidnaping News : ठाणे येथील जेल तलावसमोरील राबोडी पुलाखाली राहत असलेल्या एका महिलेच्या पाच महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.
ठाणे :- ठाणे येथील जेल तलावसमोरील राबोडी पुलाखाली राहत असलेल्या एका महिलेच्या पाच महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याचा Thane Kidnaping News प्रकार शनिवारी उघडकीस आला. या गुन्ह्याचा तपास करून राबोडी पोलिसांनी Rabodi Police Station अवघ्या चार तासात तीनजणांना अटक करून त्यांच्या तावडीतून बाळाची सुखरुप सुटका केली. Thane Kidnaping News
ठाण्या-मुंबईतून लहान बाळ चोरी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. दरम्यान, ठाण्यातील जेल तलावसमोरील ब्रिज खाली आसरा घेतलेल्या एका गरीब कुटुंबातील 5 महिन्याचे बाळ अज्ञात इसमाने अपहरण करून नेल्याची घटना शनिवारी पहाटे समोर आली. बाळाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अपहरण कर्त्याचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी अवघ्या सहा तासाच्या आत आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढत त्यांना ताब्यात घेतले. तिघांच्या ताब्यातून अपहरण झालेल्या बाळाची पोलिसांनी सुखरूप सुटका करून हे बाळ आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. जावेद अजमत अली न्हावी (35 वय ), जयश्री नाईक (45 वय), सुरेखा खंडागळे (34 वय ) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडेकर, पोलिसावलदार विक्रम शिंदे, गांगुर्डे, तानाजी अंबूरे, सागर पाटील, प्रकाश जाधव, पंकज दाभाडे, संदीप चव्हाण यांच्या टीमने चार तासात अपहरण झालेल्या पाच महिन्याच्या बाळाचे व आरोपींचे शोध घेतले आहे. उद्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत मारकड हे करत आहे. Thane Kidnaping News