ठाणेमुंबई
Trending

Thane Job Alert : ठाणे महानगरपालिकेत 1773 पदांची भरती; नोकरीची मोठी संधी

Thane TMC Job Alert News : गट-क आणि गट-ड पदांसाठी 12 ऑगस्टपासून अर्ज स्वीकारले जातील

ठाणे :- ठाणे महानगरपालिका Thane TMC आस्थापनेवरील गट-क आणि गट-ड मधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये प्रशासकीय, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, सार्वजनिक आरोग्य सेवा अशा विविध विभागांतील एकूण 1773 रिक्त पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. Thane Latest Crime News

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून, 2 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क

अमागास प्रवर्ग: 1000 रुपये

मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग: 900 रुपये

या भरतीसाठीच्या सविस्तर जाहिरातीमध्ये पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, निवड पद्धत आणि आरक्षणाविषयीच्या सर्व तरतुदी उपलब्ध आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. परीक्षेची तारीख आणि इतर माहिती प्रवेशपत्रावर कळवली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0