क्राईम न्यूजमुंबई

ठाणे : निवडणुकीदरम्यान अवैध शस्त्र जवळ बाळगणाऱ्या विरोधात पोलीस ॲक्शन मोडमध्ये, पोलिसाच्या दोन कारवाईमध्ये दोघांना शस्त्रासह अटक

Thane Police Arrested Illegal Weapon User : विधानसभा निवडणुकीदरम्यान अवैध शस्त्र जवळ बाळगणाऱ्यांवर पोलिसांची कठोर कारवाई, 3 माऊजर पिस्टल,3 गावठी कट्टा आणि 8 जिवंत काडतुसे जप्त, दोन आरोपी गजाआड

ठाणे :- विधानसभा निवडणुकी दरम्यान अवैध शस्त्र जवळ बाळगणाऱ्या विरोधात ठाणे पोलिसांच्या Thane Police अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा Thane Crime Branch यांनी कारवाई सुरू केली आहे. निवडणुकीदरम्यान ठाण्यात वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले आहे.कारवाई मध्ये पोलिसांनी दोन्ही आरोपींना कडून 3 माऊजर पिस्टल,3 illegal Weapons Siezed गावठी बनावटीचे कट्टा असे एकूण 6 अग्निशस्त्रे आणि 8 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांनी त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमीनुसार भिवंडी निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमर बबन शेख (36 वय, रा. दादाजी कोंडदेव स्टेडियम च्या मागे ठाणे) दोन पिस्टल 3 गावठी कट्टे आणि 6 जिवंत काडतुसे घेऊन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी सापळा रचून उमर शेख याला गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असा एकूण 3 लाख 2 हजार किंमतीच्या मुद्देमाल सह अटक करण्यात आली आहे.आरोपीच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले यांना गुप्त बातमिदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मोनू गेदनलाल मौर्या, (वय 21 रा. कलीया तांडा, जिल्हा बरेली, उत्तर प्रदेश) यास वागळे इस्टेट पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे कब्जातून गावठी बनावटीचे 1 पिस्टल व 2 जिवंत काडतुसे असे एकूण 1 लाख 4 हजार रू. किंमतीचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला आहे. वागळे इस्टेट पोलीस स्टेशन, ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा चे कलम 3,25 सह महाराष्ट्र, पोलीस अधिनीयम वे कलम 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही गुन्हयाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्फत सुरू आहे.

पोलीस पथक
शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), धनाजी क्षिरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) गुन्हे शाखा याच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश गावित, पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, राजेंद्र निकम, पोलीस उपनिरीक्षक मोहन परब, पोलीस हवालदार प्रशांत राणे, हरिष तावडे, शिवाजी वासरवाड, अभिजीत मोरे, अमोल देसाई, हेमंत महाले, महेश साबळे, संदीप भांगरे, पोलीस नाईक अनुप राक्षे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0