क्राईम न्यूज

Thane Hit And Run News : ठाण्यात हिट अँड रन प्रकरण, भरधाव कारने दुचाकीला उडवले, 21 वर्षीय दर्शन हेगडेचा मृत्यू

Thane Hit And Run Case : ठाण्यात भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ठाणे :- ठाण्यात भरधाव वेगात आलेल्या Thane Hit And Run कारने दुचाकीस्वाराला धडक देऊन त्याला उडवल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. या घटनेत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. आता पोलीस Thane Police त्याच्या शोध घेत आहेत.

नौपाडा पोलिसांनी चालकाचा शोध सुरू केला आहे. ठाण्यातील नितीन जंक्शन येथे हा अपघात झाला. वागळे इस्टेट येथे राहणारे दर्शन शशिधर हेगडे (21वय ) असे मृताचे नाव आहे. दर्शन हेगडे हे वागळे इस्टेट येथील संत ज्ञानेश्वर साईकृपा सदन चाळ येथील रहिवासी होते.ही घटना सोमवार मध्यरात्रीच्या सुमारास घडली. भरधाव वेगात आलेल्या कारने दर्शनच्या मोटारसायकलला धडक दिल्याने ते जमिनीवर पडले आणि गंभीर जखमी झाले.

दर्शन हे वागळे इस्टेट येथून मोठ्या भावाच्या मोटारसायकलवरून परतत होते. जेवण आणण्यासाठी गेला होता. नितीन जंक्शन येथून जात असताना नाशिक महामार्गावर मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाचा क्रमांक एमएच 02 बीके 1200 हा दुचाकीला धडकला. धडक दिल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

नौपाडा पोलीस ठाण्यात BNS च्या कलम 106 (2), 281 आणि 125 (बी) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपी चालकाची ओळख पटविण्यासाठी व त्याला अटक करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts