Thane Gold Thief : ठाण्यात चोरी ; सहा लाखाहून अधिक किंमतीचे दागिने लंपास

Varatak Nagar Police Case Filed Against Criminal : वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपीचा शोध, कलम 380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद
ठाणे :- ठाणे चोरीची घटना Thane Gold Thief News समोर आली असून या चोरीमध्ये चोरट्याने सहा लाखाहून अधिक किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आली आहे. फिर्यादी यांनी ठाण्याच्या वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यावरून गुन्ह्याची नोंद करून कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वर्तक नगर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेत आहेत. Thane Crime News
पोकर रोड नं. 2 येथे राहणाऱ्या एका 60 वर्षीय महिलेच्या घरात पाच मार्च ते 6 मार्च दरम्यान कोण नसताना यांचे राहते घराच्या उघडया दरवाज्यावाटे कोणीतरी अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करून घरातील एकुण 6 लाख 93 हजार रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग फिर्यादी यांचे संमतीशिवाय चोरी करून नेली आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि.कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शेट्टी हया करीत आहे. Thane Crime News