क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Fraud Arrested : क्राइम ब्रांच अधिकारी सांगत तोतया अधिकाऱ्यांकडून 56 जणांची फसवणूक, ठाण्यात ज्येष्ठांची फसवणूक!

Thane Crime Branch Arrested Fraudster From Lucknow : ठाणे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी आरोपींना लखनऊ उत्तर प्रदेश येथून 2 तोतया अधिकारी अटक केली आहे

ठाणे :- क्राइम ब्रांच अधिकारी Thane Fake Crime Branch Officer सांगत फसवणूक करणाऱ्या 2 तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. वागळे इस्टेट पोलिसांच्या गुन्हे Wagle Estate Police Station प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी क्राइम ब्रांच अधिकारी असल्याचे दाखवून 56 जणांची फसवणूक आणि ठाण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक प्रकरणातील 2 आरोपींना उत्तर प्रदेश लखनऊ येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सोनाली व्यंकटेशानंद घाट यांचे वडील सदानंद रामचंद्र पाध्ये (86 वय रा. रहेजा गार्डन वागळे इस्टेट ठाणे) यांना राकेश सिंग नावाच्या क्राइम ब्रांच ऑफिसर मधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने मनी लॉन्ड्री चा एफ आय आर दाखल करण्यात आला आहे. तुमच्यावर नरेश पांडे यांनी अटक वॉरंट जारी केले असल्याचे सांगितले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी तसेच निर्दोष सर्टिफिकेट देण्यासाठी सदानंद पाद्य यांना आठ लाख 65 हजार 153 रुपयांची आरटीजीएस करण्यास सांगितले आणि त्यावरून आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सोनाली घाट यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून बी.एन.एस.कलम 319(2),318(4) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66 (क) ,66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन गुन्हयामध्ये जेष्ठ नागरिकांची फसवणुक झाली असल्याने पोलीस आयुक्त यांचे आदेशावरून गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याकरीता शिवाजी गवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वागळे इस्टेट पोलीस स्टेशन यांनी प्रविण माने पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपासी अधिकारी प्रविण सावंत पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक जगताप, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार, महिला पोलीस शिपाई पटेल यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सुचना देवुन मार्गदर्शन केले. त्याआधारे गुन्हयाच्या केलेल्या तपासात आरोपी याच्याबाबत तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याची माहिती काढुन कौशल्यपुर्ण तपास केला. तपासामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे लखनऊ, उत्तरप्रदेश या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक जगताप व पोलीस पथक रवाना केले. पोलिसांनी लखनऊ, उत्तरप्रदेश या ठिकाणी संशयित व्यक्तींच्या शोध घेवुन त्यास तांत्रिक पुराव्याच्या आधारे ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रौचक अजयकुमार श्रीवास्तव (वय 29 वर्षे, रा., लखनऊ, उत्तरप्रदेश) संदिप कमलेशसिंग यादव (वय 26, रा. हरदोई ग्रामीण, उत्तरप्रदेश) असे 2 आरोपी यांना गुन्हयात दिनांक 14 डिसेंबर रोजी लखनऊ, उत्तरप्रदेश येथे अटक करून त्यांचा न्यायालयाकडुन ट्रान्झिट रिमांड घेवुन पुढील तपासकामी ठाणे येथे आणले आहे. आरोपी यांच्याकडुन फिर्यादी यांच्या वडिलांची फसवणुक करून प्राप्त केलेल्या रक्कमेपैकी 5 लाख 65 हजार रू. रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच 5 मोबाईल,कार, बॅग, एअरटेल कंपनीचे 6 सिमकार्ड वेगवेगळया कंपनीचे 20 डेबिट कार्ड,बँकांचे वेगवेगळया खात्याचे 09 चेक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असुन तपासामध्ये यातील आरोपी यांच्याकडुन प्राप्त केलेल्या बँक खात्यांचा तपास केला असता त्यांनी एकुण 59 जणांची फसवणुक केली असुन त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यास तक्रार प्राप्त असुन त्याबाबत तपास चालु आहे. सदर आरोपी यानी फसवणुक केलेली रक्कम ही क्रिप्टो करन्सी मध्ये परावर्तित केलेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्याबाबत तांत्रिक तपास करून अदयापपावेतो जवळपास 4000 क्रिप्टो करन्सी (USDT) अंदाजे 3.20 लाख इतक्या रकमेचा शोध लागला असुन पुढील तपास चालु आहे.

गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, विनायक देशमुख अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे प्रशांत कदम पोलीस उप आयुक्त परिमंडळ-5 वागळे इस्टेट, ठाणे, हेमंत शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वागळे इस्टेट विभाग, ठाणे यांनी सुचना देवुन मार्गदर्शन केलेले आहे.

गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन शिवाजी गवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वागळे इस्टेट पोलीस स्टेशन यांनी प्रविण माने पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण सावंत पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक जगताप, पोलीस हवालदार गावडे, शिरसाठ, पोलीस नाईक चव्हाण, पोलीस शिपाई वाघमारे महिला पोलीस शिपाई पटेल यांना दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हयातील आरोपी यांच्याबाबत काहीएक ठोस माहिती नसताना गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक प्रविण सावंत हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0