Thane Fit India Campaign News : ठाण्यात ‘फिट इंडिया’ मोहिमेचा जागर; पोलीस आणि नागरिक एकत्र सायकल चालवणार!

•‘फिटनेस की डोज, आधा घंटा रोज’ या संदेशासह 24 ऑगस्ट रोजी भव्य सायकल रॅली
ठाणे :- भारत सरकारच्या ‘फिट इंडिया’ मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे शहर पोलीस आणि ठाणेकर नागरिक एकत्रित येत आहेत. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता साकेत येथून एक भव्य सायकल रॅली (सायकलथॉन) आयोजित करण्यात आली आहे. पोलीस दल आणि नागरिकांमध्ये ‘फिटनेस की डोज, आधा घंटा रोज’ हा संदेश रुजवून फिटनेसला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे.
ही सायकल रॅली ठाणे पोलीस आयुक्तालय आणि शहरातील नागरिक यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर, ठाण्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
10 किलोमीटरचा मार्ग
रॅलीची सुरुवात साकेत मैदानापासून होईल. त्यानंतर, ती किकनाका, कोर्ट नाका, चिंतमणी चौक, गजानन चौक, दगडी शाळा, राम मारुती रोड, आम्रपाली हॉटेल, तीन पेट्रोल पंप, हरी निवास, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन, एलबीएस रोड, तीन हात नाका ब्रिज, माजिवाडा जंक्शन, माजिवाडा ब्रिज, महालक्ष्मी मंदिर आणि साकेत सोसायटी मार्गे पुन्हा साकेत मैदानात येऊन समाप्त होईल.
25 किलोमीटरचा मार्ग
या मार्गावर सहभागी होणाऱ्यांसाठी रॅली साकेत मैदानातून सुरू होईल. किकनाका, कोर्ट नाका, चिंतमणी चौक, आम्रपाली हॉटेल, दगडी शाळा, राम मारुती रोड, गजानन चौक, तीन पेट्रोल पंप, हरी निवास, एलबीएस रोड, तीन हात नाका ब्रिज, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन, वर्तकनगर, शिवाई नगर, उपवन तलाव, गावंडबाग जंक्शन, बिरसा मुंडा चौक, काशिनाथ घाणेकर चौक, घोडबंदर रोड, ब्रह्मांड, मानपाडा, कापूरबावडी, माजिवाडा, महालक्ष्मी मंदिर, साकेत सोसायटी, हिरानंदानी इस्टेट, निलकंठ बंगले चौक, मुल्ला बाग, पातलीपाडा उड्डाणपूल आणि शेवटी साकेत मैदानात येऊन समाप्त होईल.



