•Thane Police destroy 1592 kg of drugs ठाणे पोलिसांनी 60 गुन्ह्यातील तब्बल 1592 किलो 753 ग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केले
ठाणे :- पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेल्या अमली पदार्थांचा साठा मुंबई वेस्ट मॅनेजमेंट एमआयडीसी तळोजा नवी मुंबई कंपनीच्या भट्टीत जाळण्यात आला. पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत केलेला कारवाईमध्ये 60 गुन्ह्यांमध्ये तब्बल 1592 किलो 753 ग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केला आहे.
गांजा 40 गुन्ह्यांमध्ये 1552 किलो 776 ग्रॅम जप्त केला होता.चरस 8 गुन्ह्यांमध्ये 25 किलो 267 ग्रॅम,एम.डी 10 गुन्ह्यांमध्ये 12 किलो 8 ग्रॅम ,इफिड्रीन 1 गुन्ह्यांमध्ये 1 किलो 152 ग्रॅम,अफिम 1 गुन्ह्यांमध्ये 1 किलो 500 ग्रॅम अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
मुद्देमाल नाश कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे डॉ. पंजाबराव उगले यांचे अध्यक्षतेखाली मुद्देमाल नाश समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय-1, ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रतिबंध, गुन्हे शाखा, ठाणे शहर तसेच वैभव जोशीलकर, सहाय्यक रासायनिक विश्लेषक, ज्ञायवैज्ञानिक प्रयोगशाळा, कलिना, मुंबई, दिपक मुकुंद मंडोळ, ठाणे महानगर पालिका, ठाणे, लक्ष्मीकांत पुंडलिक बासुतकर, ठाणे महानगर पालिका, ठाणे यांचे उपस्थितीत मुद्देमाल नाश करण्यात आला आहे.
राहुल मस्के, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी तसेच प्रत्येक परिमंडळानुसार नेमलेल नोडल अधिकारी परिमंडळ-1 ठाणे चे पोलीस निरीक्षक संजय दवणे, परिमंडळ-2 भिवंडीचे पोलीस निरीक्षक अतुल आडुरकर, परिमंडळ-3 कल्याणचे पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे, परिमंडळ-4 उल्हासनगरचे पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे, परिमंडळ-5 वागळेचे पोलीस निरीक्षक संदिप धांडे, पोलीस हवालदार हरीश तावडे, पोलीस हवालदार हुसेन तडवी, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महिला पोलीस शिपाई कोमल लादे यांनी सदरची प्रक्रीया पुर्ण केली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…