•शिळफाटा-दिवा रोडवर पहाटेच्या सुमारास थरारक कारवाई; आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
ठाणे | अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध ठाणे पोलीस आयुक्तांनी पुकारलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दिवा परिसरात सापळा रचून 6 कोटी 94 लाख 40 हजार रुपये किमतीचे 1 किलो 736 ग्रॅम ‘हेरॉईन’ जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ठाणे आणि कुर्ला येथील दोन आरोपींना अटक केली असून, यामागे एक मोठी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
ह्युमिनिटी स्कूलसमोर पोलिसांनी रचला सापळा
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, 23 जानेवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास दिवा येथील शिळफाटा रोडवर ड्रग्जची मोठी देवाणघेवाण होणार होती. या माहितीची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी तातडीने पथक तैनात केले. पथकाने ह्युमिनिटी पब्लिक स्कूलसमोर सापळा लावून तलत वजाहत रसुल सय्यद (वय 47, रा. खर्डी, ठाणे) याला शिताफीने ताब्यात घेतले.
झडतीत 7 कोटींचे हेरॉईन हस्तगत
पोलिसांनी तलत सय्यदची झडती घेतली असता, त्याच्याकडे 6 कोटी 94 लाख 40 हजार रुपये किमतीचा 1 किलो 736 ग्रॅम हेरॉईन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेला मिळून आला. पोलिसांनी तातडीने हा साठा जप्त केला. या गुन्ह्यात अधिक तपास केला असता, त्याचा साथीदार मोहम्मद खान अहमद खान महाडीक (वय 67, रा. कुर्ला, मुंबई) याचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महाडीकलाही अटक केली आहे.
आंतरराज्यीय साखळी उघडकीस
या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोन्ही आरोपी केवळ वितरक नसून एका मोठ्या आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या साखळीचा भाग आहेत. हे ड्रग्ज कोठून आणले गेले आणि मुंबई-ठाण्यात ते कोणाला पुरवले जाणार होते, याचा सखोल तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील करत आहेत. शिळ डायघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी एनडीपीएस (NDPS) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या पथकाची कामगिरी
ही मोठी कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील, दिपक डुम्मलवाड आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…