Thane Drug News : रिक्षा चालक निघाला “कोकेन” घेवुन
•वागळे इस्टेट पोलिसांचे कारवाई, रिक्षा चालकाच्या जवळ आढळले कोकेन
ठाणे :- लोकसभा निवडणूक लागू झाल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशासन कामाला लागले आहे. कोणत्याही प्रकारे अमली पदार्थ मद्य, तंबाखूजन्य पदार्थ यांची खरेदी-विक्री होणार नाही याच्यावर शासनाचे प्रशासनाचे करडी नजर आहे पोलीस यामध्ये कठोर भूमिका बजावत आहे.
05 एप्रिल रोजी दुपारी 3.45 वा. चे सुमारास, गुन्हे शाखा, घटक-5, वागळे इस्टेट चे पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार रावते व त्यांचे पथकाने, मॉडेला नाका, मेट्रो ब्रिज पिलरजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम येथे सापळा रचुन आरोपी मनजीत सिताराम सॉ, (36 वर्षे), (रा.शास्त्रीनगर, विलेपार्ले पुर्व) मुंबई याची रिक्षा ताब्यात घेवुन त्या रिक्षाची झडती घेतली असता यामध्ये कोकेन हा अंमली पदार्थ, एक विवो व एक आयटेल कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम, असा एकुण 11 लाख 72 हजार 380 रूपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या विक्रीकरिता बाळगुन आला. प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपींविरूध्द गुन्हा एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (क), 21 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. फरारी आरोपीचा शोध घेत आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत.