ठाणे:महाराष्ट्र मिरर
विवेक राजेंद्र जगताप
Thane News : ओडिशातून गांजा उचलायचा, नागपूर–ठाणे–मुंबईत विकायचा आणि पोलिसांवर गाडी घालून पसार व्हायचं —
अशी ड्रग्स माफियांची मस्ती अखेर ठाणे पोलिसांनी मोडून काढली आहे!
आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या कुख्यात टोळीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाने मोक्का अंतर्गत दुसरी मोठी कारवाई करत १४ आरोपींना जेरबंद केले आहे.
ही कारवाई म्हणजे ड्रग्स रॅकेटच्या मुळावर घाव घालणारी आहे.Thane Latest Drug News
पोलिसांवर गाडी घालून पळ काढण्याचा प्रयत्न
२८ ऑगस्ट २०२५ रोजी गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून
कल्याणच्या सुभाष चौक–वालधुनी ब्रिज परिसरात
निळ्या रंगाच्या सुझुकी बलेनो कारमधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली.
महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलिरामसिंग परदेशी
यांच्या नेतृत्वाखाली
पोलीस व वाहतूक शाखेने संयुक्त सापळा रचला.
पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न करताच
आरोपींनी चक्क पोलीस कॉन्स्टेबलवर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला!
तरीही पोलिसांनी पाठलाग करत कारसह एक आरोपी पकडला.
३५ किलो गांजा, पिस्तूल आणि लाखोंचा मुद्देमाल
कारची झडती घेताच
● ३५ किलो ४०० ग्रॅम गांजा (किंमत ₹८.८५ लाख)
● गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे (₹५० हजार)
● सुझुकी बलेनो कार (₹७ लाख)
असा एकूण
● ₹१६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नागपूर–भिवंडी–ओडिशा कनेक्शन उघड
तपासात धक्कादायक माहिती समोर आली — ही टोळी
● ओडिशातून गांजाची मोठ्या प्रमाणात खरेदी
● नागपूर, ठाणे, मुंबई, नाशिकमध्ये विक्री
● स्वतःचा संघटित गुन्हेगारी नेटवर्क
चालवत होती.
अटक आरोपींवर
● नागपूर शहरात एनडीपीएस अंतर्गत ४० हून अधिक गुन्हे
दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
मोक्काचा फास — थेट तुरुंगात
संघटित गुन्हेगारीचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का)
लावण्यास परवानगी देण्यात आली.
१४ आरोपींना
● मोक्का कलम 3(1)(ii), 3(2), 3(4)
लावून
● २३ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे.
ठाणे पोलिसांची करडी मुसंडी
ही धडक कारवाई
अपर पोलीस आयुक्त संजय जाधव,
पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे,
सहा. पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे
यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलिरामसिंग परदेशी व गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
ड्रग्स माफियांना ठाणे पोलिसांचा थेट इशारा —
“महाराष्ट्रात धंदा चालवायचा असेल तर सरळ तुरुंगात जा!”
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…