Thane Cyber Fraud News : सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार….काय आहे ‘पार्ट टाईम जॉब स्कॅम’?
Thane Cyber Fraud News : सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे.
ठाणे :- सणासुदीच्या दिवसांत Ganpati Festival राज्यात सायबर गुन्हेगारांच्या Cyber Crime In Thane टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा Job Fraud In Thane नवा प्रकार शोधून काढला आहे. पार्ट टाइम जॉब Part Time Job Fraud असल्याचे सांगून टेलिग्रामधारक व्यक्तीने इतर वेबसाईटधारक व्यक्तींना पार्ट टाइम जॉब माहिती देऊन ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास प्रत्येक दिवशी 2300 रुपये चे 3000 रुपये नफा मिळण्याचे आमिष दाखविले आहे.अशाप्रकारे फसवणुकीच्या अनेक तक्रारी राज्यभरातील सायबर पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. Thane Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय तरुणीला पार्ट टाइम जॉब च्या नावाखाली टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून टास्क पूर्ण केल्यास 2300 रुपयाला तीन हजार रुपये मिळण्याचे आमिष दाखविले होते. फिर्यादी महिलेला आरोपीने तब्बल 11 लाख 39 हजार 722 रुपये वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. परंतु कालांतराने ऑनलाईन पैसे भरूनही कोणत्याही प्रकारचा परतावांना न मिळाल्याने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात Wagle Easted Police Station दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66 (ड), 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण हे करत आहे. Thane Latest Crime News