मुंबई

Thane Cyber Crime News : ठाण्यात सायबर लुटमार! – 85 लाखांची फसवणूक; बनावट ॲपवर ‘6 कोटी नफ्याचे’ अमिष दाखवून सेवानिवृत्ताची आयुष्यभराची कमाई लुटली

Thane Latest Cyber Crime News : फेसबुकवर ट्रेडिंग संदेशाद्वारे जाळ्यात ओढले; नफा काढण्यासाठी पुन्हा 1.30 कोटींची मागणी होताच फसवणूक उघड; कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे :- शेअर बाजारात आकर्षक आणि जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार बनावट मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. घोडबंदर परिसरात राहणाऱ्या एका 58 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला फसवणूक करणाऱ्यांनी तब्बल 85 लाख 37 हजार 413 रुपये गमावण्यास भाग पाडले आहे. Thane Latest Crime News

घोडबंदर येथील कासारवडवली भागात पत्नीसह राहणाऱ्या या सेवानिवृत्त व्यक्तीला दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या फेसबुक खात्यावर ट्रेडिंग माहिती देणारा संदेश प्राप्त झाला. त्या संदेशाच्या आधारे त्यांनी मोबाइल क्रमांक मिळवून घेतला आणि त्यांना एका व्हॉट्सॲप समूहामध्ये जोडण्यात आले. या समूहात त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकवर क्लिक केल्यावर त्यांच्या मोबाईलमध्ये एक बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशन सुरू झाले. Thane Latest Cyber Crime News

या ॲपवर विश्वास ठेवून सेवानिवृत्त व्यक्तीने त्यांची वैयक्तिक माहिती भरली आणि त्यांची आयुष्यभराची जमापुंजी असलेले 85 लाखांहून अधिक रुपये टप्प्याटप्प्याने ऑनलाइन पद्धतीने विविध बँक खात्यांत जमा केले. काही दिवसांनी या बनावट ॲपवर त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर नफा म्हणून 6 कोटी 51 लाख 52 हजार 380 रुपये इतकी मोठी रक्कम दाखवण्यात आली. मात्र, जेव्हा नफा काढण्याची वेळ आली, तेव्हा गुन्हेगारांनी नफा देण्यासाठी पुन्हा 1 कोटी 30 लाख रुपये भरण्यास सांगितले. नफा काढण्यासाठी शुल्क कशासाठी, असा संशय सेवानिवृत्त व्यक्तीला आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या घटनेनंतर त्यांनी तात्काळ 1930 या मदत क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली आणि कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago