Thane Cyber Crime Department : ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाच्या उत्तम कामगिरीमुळे,”सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन”सेलला पोलीस ठाण्याचा दर्जा
Thane CP Ashutosh Dumbare inaugurate Thane Cyber Crime Department : सायबर पोलीस ठाणे, नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या Thane Police Station अंतर्गत येणाऱ्या सायबर पोलिसांच्या Thane Cyber Crime Department कामगिरीमुळे आणि सध्या आधुनिक यंत्रणाचा वापर करून होत असल्यास लुटीवर नियंत्रण ठेवण्याकरिता ठाणे पोलिसांकडून सायबर इन्वेस्टीगेशन कार्यालय उभारण्यात आले असून याला पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला आहे.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाच्या 1930 हेल्पलाईन वरून अनेक तक्रारी आतापर्यंत सोडविण्यात आले आहे. Thane Latest Crime News
पोलीस ठाण्यांव्यतिरिक्त सायबर लॅब आणि तंत्रज्ञान युक्त गुन्हे अन्वेषण केंद्राला सायबर पोलीस ठाणे असे घोषित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांच्या हस्ते सुसज्ज सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग तसेच आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सायबर पोलीस ठाण्यातील नियुक्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे उपस्थितीमध्ये अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असे सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे Thane Latest Crime News