क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Crypto Fraud : ORIS.TEAM, POLAND या क्रिप्टो करन्सी माध्यमातुन गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Thane Crypto Fraud : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश, महाराष्ट्रासह देशभरात नेटवर्क, कोट्यावधीची फसवणूक, लोकांचे पैसे घेऊन “वन टू का फोर”

  • क्रिप्टो करन्सी च्या नावाखाली गुंतवणूकदारांचे फसवणूक करणाऱ्या टोळीच्या सदस्यांना अटक मुख्य सूत्रधार फरार

ठाणे :- क्रिप्टो करेन्सी Crypto Fraud मध्ये गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेला कारवाईत या टोळीतील तीन सदस्यांचा म्हणजेच एजंटला म्हणजेच रवी ठाकूर,अविनाश सिंग, सेजल शिवकर यांना अटक केली आहे. Thane Police पोलिसांकडून मुख्य सूत्रधार राहुल खुराना याचा शोध घेतला जात आहे.

मुंब्रातील तक्रारीचे देशभरात चर्चा, फसवणुकीची मोठी यादी समोर येण्याची शक्यता

मुंब्रा पोलीस ठाण्यात Mumbra Police Station दाखल असलेल्या एका प्रकरणातून या फसवणुकीचा मोठा काळा बाजार समोर आला आहे.ORIS.TEAM, POLAND या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 12 जणांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. फिर्यादी रूक्कया हुसेन अली शाह, (23 वय) यांच्या तक्रारीमुळे क्रिप्टो करन्सी चे प्रकरण उघडकीस आले आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात रूक्कया हुसेन अली शाह, यांच्या तक्रारीवरून भादवी कलम 420, 406,409,503 महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबधाचे संरक्षण अधिनियम 1999 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (सी),66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, महाराष्ट्र मिररच्या सूत्रानुसार क्रिप्टो करन्सी च्या Crypto Fraud नावाखाली कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्यांची नावे समोर आले आहेत. Thane Latest Cyber Crime News

पोलिसांची कारवाईवर प्रश्नचिन्ह?

ORIS.TEAM, POLAND या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडणारा एजंट यांचे नेटवर्क केवळ महाराष्ट्रात नसून महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारत देशात असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे. महाराष्ट्रात, मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, मिरा रोड, लातूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरात तर देशातील दिल्ली, कोलकत्ता, बेंगळुरू, गोवा, हैदराबाद, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, ते जम्मू काश्मीर पर्यंत असून देशभरात त्यांचे जाळे पसरले आहे. यामध्ये एजंट म्हणून तरुण ऊर्फ राहुल खुराणा बदललेले नाव, आणि रवी शंकर ठाकूर यांच्या ग्रुप हे नेटवर्क ऑपरेट केले जाते. प्रत्येक शहरात एक विशेष प्रतिनिधी एजंट म्हणून नेमला असून ते एजंट अधिकाधिक ग्राहकांकडून क्रिप्टो च्या नावाखाली पैसे गुंतवणूक करण्यास सांगतात. Thane Latest Cyber Crime News

या नेटवर्कमध्ये क्रिप्टो च्या नावाखाली फॉरेन कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार असल्याचे सांगत जेवढे पैसे गुंतवणूक करणार त्यावर धावून अधिक टक्के नफा किंवा आमिष दाखविले जाते. एजंट ला दिलेला टार्गेट पूर्ण झाल्यास एजंट तिथून वन टू का फोर होऊन ग्राहकांची मोठ्या प्रमाणे फसवणूक करतात असा प्रकारे हे नेटवर्क असून याचे केवळ महाराष्ट्रातच नाही नवी मुंबईतच नाही तर संपूर्ण भारतामध्ये नेटवर्क आहे. Thane Latest Cyber Crime News

फसवणूक झालेल्या तक्रारदारांना पैसे परत मिळणार का.?

मुंब्रा मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात केवळ 12 फसवणूक झाले आहे असे नाही तर कोट्यावधींची फसवणूक झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या एजंटचा पोलिसांकडून लवकरच पर्दाफाश होईल आणखी काही नावं समोर येतात का? पोलिसांनी या नेटवर्कचा खुलासा करणे आव्हानात्मक असलं तरी पोलीस लवकर मुख्य सुत्रधाराकडे पोहोचल आणि लवकरच आणखी नावं समोर येईल. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अद्यापही मूळ सूत्रधार भेटले नसून केवळ एजंट किंवा कामगारच हाती लागले आहे. मूळ सूत्रधार फरार असल्याच्या देखावा आहे का? याबाबत शंका उपस्थित होत आहे. पोलिसांच्या विशेष सूत्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे यांचा मूख्य सूत्रधार असलेला ,तरुण त्रिखा ऊर्फ राहुल खुराना स्पेशल प्रोटेक्शन घेवून फरार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार फरार आरोपी दिल्लीत असल्याची माहिती मिळाली आहे. Thane Latest Cyber Crime News

क्रमशः

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0