•Thane Crime News विदेशी महिलांचा वेश्याव्यवसाय व्यापार करणाऱ्या महिलेचा ठाणे पोलिसांनी केला पर्दाफाश, बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक
ठाणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम ग्राउंड असलेल्या ठाण्याच्या लुईस वाडी परिसरात एका विदेशी महिलेकडून विदेशी महिलांचे वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाच्या महिला पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. ठाणे शहरासह मुंबई लोणावळा गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी काही दिवसांपासून विदेशी महिला दलाल कडून विदेशी महिलेंच देहविक्रीचा व्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक चेतना चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते बिनु वर्गिस त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाण्याच्या लुईस वाडी, वागळे इस्टेट, ठाणे येथे असलेले विट्स शरणम हॉटेल येते एक थायलंडमध्ये राहत असलेल्या महिलामार्फत देहविक्रीचा व्यापार चालू असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी सापळा रचून बोगस ग्राहकांच्या मदतीने छापा टाकला असता पोलिसांनी एक थायलंड महिला दलाला जिचे नाव मिस सालीका उडोम बाबनालाब (44 वर्ष) तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन पिडीत विदेशी(थायलंड) महिलांची सुटका करण्यात आली आहे. महिला दलाल आरोपीच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भादवि कलम 370(2),370(3) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 प्रमाणे 21 जून 2024 रोजी दलाल महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, तीन पीडीत महिलेचे सुटकाही करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्र पुरविणाऱ्या परदेशी नागरिकाला पुण्यातून अटक..
पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता अटक केलेल्या महिलेकडे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड हे भारतीय कागदपत्रे आढळून आले. पोलिसांनी त्या कागदपत्र संदर्भात विचारले असता ते कागदपत्र पुण्यातील एका बागडी अब्दुल्लाह मुगहेड साद जो पुण्याला राहत असून तो मूळचा यमन या देशातला नागरिक आहे. पोलिसांनी एक पथक तयार करून साद याचा तांत्रिक यंत्रणा द्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे, खंडणी विरोधी पथक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहिते, पोलीस हवालदार पाटील, पोलीस शिपाई तानाजी पाटील,महिला पोलीस शिपाई खरात यांच्या पथकाने 25 जून 2024 रोजी पुणे येथे जाऊन बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या साद याला अटक केली आहे. वेश्या व्यापार मग करणाऱ्या दलाल महिलेचा पासपोर्ट आणि वागडी अब्दुल्लाह याचा पासपोर्टचा व्हिजा मुदत संपली असून ते बेकायदेशीररित्या भारतामध्ये वास्तव्य करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्या विरोधात परदेशी नागरिक अधिनियमान 1946 चे कलम 14 (A) (C) कलम वाढवण्यात आले असून, अटक आरोपी हे भारताच्या नागरिक नसताना देखील त्यांची बनावट कागदपत्रे बनून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.हे बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीचा हात असू शकतो. पोलिसांकडून या टोळीचा शोध घेण्यात येत आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथकाचे महिला पोलीस निरीक्षक विनिता पाटील करत आहे.
पोलीस पथक
आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर,डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) ठाणे शहर, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) ठाणे शहर, इंद्रजित कार्ले, प्रतिबंध, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, पोलीस हवालदार तानाजी पाटील, AHTU, गुन्हे शाखे कडील महिला पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक श्रध्दा कदम, डी. व्ही. चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी के. बालगुडे. डी.एस. मोहिते, पोलीस हवालदार के. बी. पाटील, महिला पोलीस अंमलदार पी.जी. खरात, के. एम. चांदेकर, बी.एच. पाटील, पोलीस नाईक यु.एम. घाडगे हे करीत आहेत.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…