Thane Crime News : घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या सराईत सुशिक्षित चोरट्याला अटक ; नौपाडा पोलिसांची कामगिरी

Thane Nawpada Police Arrested Criminal : दुबईत नोकरी करणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेतलेल्या परंतु नशेच्या आहारी गेलेल्या सराईत चोरट्याला पोलिसांच्या बेड्या ; सात गुन्ह्यांची उकल
ठाणे :- घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या एका सराईत उच्च शिक्षण घेतलेल्या आणि दुबईत नोकरी केलेल्या परंतु नशेच्या आहारी गेलेल्या एका सराईत गुन्हेगाराला ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. Thane Nawpada Police Arrested Fraudster पोलिसांनी आरोपीकडून चार ऑटोरिक्षा, एक मोटरसायकल, रोख रक्कम असा एकूण तीन लाख तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीचे सात गुन्हे उघडकीस आणले आहे. Thane Police Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन फिर्यादी मोहम्मद जमाल शेख यांची रिक्षा चोरी केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या संपूर्ण पुण्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे हे करत होते. अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन,पोलीस निरीक्षक गुन्हे कुंभार यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी यांनी घटनास्थळी पासून येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावरील सुमारे 70 ते 80 सीसीटीव्ही फुटेज तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आहे.
पोलिसांनी तपासा दरम्यान मिळालेल्या गोपनीय बातमीदाराकडून आरोपी हा नौपाडा परिसरात पुन्हा रिक्षा चोरी करण्यासाठी येणार असल्याची खात्रीदायक बातमी मिळाली होती. पोलिसांनी पाच पाचपाखाडी ओपन जिम परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आली आहे. शबाब हुसेन नायब हुसेन रिझवी सैयद (41 वय,रा. अमृत नगर मुंब्रा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने नौपाडा, वागळे इस्टेट, राबोडी इत्यादी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे आणि इतर गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः आरोपी हा एम कॉम पर्यंत शिकलेला असून पूर्वी तो आयटी कंपनीमध्ये डाटा एन्ट्री चे काम करत होता. तसेच आरोपी हा दुबई येथे एअरपोर्ट वरती ड्रायव्हरचे काम करत असल्याचे सांगितले आहे. आरोपीला पत्नी सोडून गेल्याने आरोपी नशेच्या आहारी गेला होता. नशा करण्यासाठी त्याने वाहन चोरी करणे सुरुवात केली. युट्युब वरून रिक्षाच्या स्विच कसे तोडायचे हे पाहून रिक्षा व दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली. आरोपी हा रिक्षा चोरी केल्यानंतर रिक्षाचे पेट्रोल असेपर्यंत भाडे मारून त्या पैशातून नशा करायचा आणि त्यानंतर ती रिक्षा सोडून द्यायचा. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याजवळून चार ऑटोरिक्षा, एक मोटर सायकल आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख तीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस पथक
आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare , सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रा. विभाग विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाळे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार राजेंद्र गायकवाड, पाटील, विलास देसाई, सचिन रांजणे, ईश्वर गोलवड, मेहरबान तडवी, पोलीस शिपाई सारंग कांगणे, गंगाधर तिर्थकर, यांनी केलेली आहे.


