•Thane Crime News मध्यवर्ती गुन्हे शाखा कक्षाचे कामगिरी ; गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला केले जेरबंद
ठाणे :- साकेत पोलीस मैदानाच्या पुढे असलेल्या नाल्याजवळ बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला मध्यवर्ती गुन्हे शाखा कक्ष यांच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळा आनंद कदम (28 वर्ष), असे आरोपीचे नाव आहे. मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष यांच्या पोलीस हवालदार नासिर, खलाटे या पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 24 जून च्या सायंकाळी 7:30 च्या सुमारास एक तरुण साकेत मैदानाच्या पुढे नाल्याजवळ साकेत राबोरी ठाणे पश्चिम येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून या तरुणाला अटक करून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे आणि रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून राबोडी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3,25(1-ब),(अ) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हे गावठी कट्टे कशासाठी आणले आहे याची चौकशी पोलिसांकडून सय्यद हे करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…