ठाणे

Thane Crime News : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक ; मालमत्ता गुन्हे कक्ष ठाणे शहर यांची कारवाई

घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे,25-30 सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने आरोपींचा मागोवा

ठाणे:- कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या चोरीबाबत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात मानपाडा, कल्याण आणि कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्ष यांनी सराईत आरोपींना कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अटक केली आहे. पोलिसांनी 25 ते 30 सीसीटीव्ही फुटेज तपासून या दोन सराईत गुन्हेगारांचा शोध लावला असून आरोपींना जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खारेगांव या ठिकाणी घरफोडी चोरीबाबत कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भादवि कलम 305 (ए),331(3),331(4) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी कळवा पोलीस आणि मालमत्ता गुन्हे कक्ष यांचा समांतर तपास चालू होता. पोलिसांनी गुन्ह्याच्या घटनास्थळावरील ये-जा मार्गावरील ठिकठिकाणी असलेले एकूण 25 ते 30 सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गुन्ह्यातील आरोपी हा रिक्षा घेऊन गुन्हा घडल्यानंतर मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या बाहेर रिक्षा सोडून त्यानंतर तिथे फोनवर बोलत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसले आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींनी फोन हा उबेर गाडी बुक करण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी उबेर चालकाकडे चौकशी केली असता आरोपीला टिटवाळा येथे सोडल्याचे उबेर चालकाने सांगितले. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल नंबर व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचे लोकेशन तपासून आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. तसेच आरोपी हे चोरीनंतर उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेश वरून कल्याण येथे येत असल्याचे आरोपींच्या लोकेशन वरून पोलिसांना कळाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींची सखोल चौकशी केली असता आरोपीने चोरी केल्याचे कबूल केले आहे. तसेच सर्व मुद्देमाल बनेली येथे राहणाऱ्या बंटी उर्फ नितीन कदम (रा.बनेली,टिटवाळा) याला विकले असल्याचे सांगितले. तसेच आरोपींनी चोरीच्या वेळी वापरलेली रिक्षा ही कोनगाव परिसरातून चोरल्याचे सांगितले आहे. आरोपींना पोलिसांनी कळवा पोलीसांना चौकशीसाठी ताब्यात दिले आहे. आरोपींच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात, कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपींची नावे

1.मोहंमद सादीक रिझवान शेख,(35 वर्ष, रा. बनेली, टिटवाळा)

2.अहमद रझा अबुबकर सिददीकी, (33 वर्ष ,रा मांडा, टिटवाळा )

पोलीस पथक
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, गुन्हे ठाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, शोध-2, गुन्हे, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन करळे, पोलीस हवालदार दिनेश कुंभारे, प्रशांत भुर्के, किशोर भामरे, पोलीस अंमलदार राजकुमार राठोड,नवनाथ कोरडे, पाटील, सदन मुळे यांनी केलेली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0