Thane Crime News : ठाण्यात चोरी ; चार लाखाहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास
•नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपीचा शोध, कलम 454 प्रमाणे गुन्ह्याची नोंद
ठाणे :- ठाणे चोरीची घटना समोर आली असून या चोरीमध्ये चोरट्याने चार लाखाहून अधिक किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आली आहे. फिर्यादी यांनी ठाण्याच्या नौपाडा श पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यावरून गुन्ह्याची नोंद करून कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नौपाडा पोलिसांकडून आरोपीचा शोध घेत आहेत.
नौपाडा येथे राहणाऱ्या चिराड अमरशी निसर (36 वर्ष) घरात पाच 24 मार्च दरम्यान कोण नसताना यांचे राहते घराच्या किचनच्या खिडकीची ग्रील तोडून कोणीतरी अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करून घरातील एकुण 4 लाख 60 हजार रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम फिर्यादी यांचे चोरी करून नेली आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि.कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लोंढे हे करीत आहे.