•चितळसर पोलिसांची मोठी कारवाई; सायबर पथकाने तांत्रिक तपास करून गुन्ह्याचा लावला छडा
ठाणे :- व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग, फोटो आणि व्हिडीओ पाठवून एका नागरिकाकडे 5 ते 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत आरोपीला ठाण्यातील चितळसर पोलिसांनी कोल्हापुरातून अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. सायबर तंत्राचा उपयोग करत पोलिसांनी अवघ्या काही तासांत या खंडणी प्रकरणाचा छडा लावला.
नेमके काय घडले?
चितळसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फिर्यादी यांना दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर वारंवार अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाठवले जात होते. आरोपीने याच माध्यमातून त्यांच्याकडे 5 लाख ते 10 लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपास ठरला निर्णायक
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चितळसर पोलीस ठाण्याचे सायबर कक्षाचे अधिकारी सपोनि शिरोळे आणि पथकाने तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी दोन्ही मोबाईल क्रमांकांचे सीडीआर (Call Detail Record) आणि तांत्रिक तपास केला. या तपासामुळे आरोपीचा माग काढण्यास मदत मिळाली.
पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मोहन ज्योतिबा पवार (वय 26, रा. मांडीदुर्ग) या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपी मोहन पवार याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यामागील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरोळे करत आहेत. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चितळसर पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…