Thane Crime News : ठाणे आर्थिक फसवणूक : स्काईप आयडीचा गैरवापर करत दहा लाखाची लूट…
•ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर अज्ञात आरोपीच्या विरोधात वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हादाखल
ठाणे :- स्काईप आयडी चा गैरवापर होत असल्याचे सांगून स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. तसेच फिर्यादी यांचे 25 खाते सुरू आहेत असं खोटा कॉल करून ते चेक करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी याने विश्वास संपादन करून आरोपी यांनी फिर्यादी यांच्या बँकेच्या खात्यातून दहा लाख रुपये ऑनलाईन पाठवल्या सांगून फसवणूक झाल्याचे घटना ठाण्याच्या सावरकर नगर येथे राहणाऱ्या संजय शंकर साळवी (57 वर्ष)यांच्यासोबत घडली आहे. पोलिसांकडून सातत्याने ऑनलाइन फसवणुकी संदर्भात व्हाट्सअप टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर आलेले मेसेज याची खात्री सर माहिती गोळा करूनच व्यवहार करावा अशी वारंवार सूचना देऊनही मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फसवणूक होत आहे.
26 जून रोजी दुपारच्या दरम्यान संजय शंकर साळवी (57 वर्ष) यांना अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप वर मेसेज करून तुमचं स्काईप आयडी चा गैरवापर होत असल्याचे सांगून स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. तसेच तुमचे 25 खाते सुरू आहे असे खोटे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून दहा लाखाची ऑनलाइन रक्कम पाठवण्यास सांगितले. परंतु ही रक्कम परत न आल्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याच्या लक्षात येतात वर्तक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि 420 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (क),66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डीबी वेडे हे करत आहे.