ठाणेमहाराष्ट्रमुंबई
Trending

Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखेचा ‘हायवे’वर थरार! ओडिसातून येणारी 2 कोटींची गांजा तस्करी रोखली; खारेगाव टोलनाक्यावर इनोव्हा कारसह तस्कर गजाआड

Thane Crime Branch Busted Drug Racket : 638 किलो गांजा जप्त: मालमत्ता कक्षाची मोठी कारवाई; तेलंगणातील आंतरराज्य टोळीचे ठाणे कनेक्शन उघड!

ठाणे | नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी Thane Police News आपली मोहीम तीव्र केली असून, गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने (Property Cell) एका आंतरराज्य गांजा तस्करीचा मोठा डाव उधळून लावला आहे. खारेगाव टोलनाक्यावर रचलेल्या सापळ्यात ओडिसा आणि तेलंगणा राज्यातून मुंबईच्या दिशेने येणारी एक आलिशान इनोव्हा कार पकडण्यात आली. या कारमधून तब्बल 2 कोटी 4 लाख रुपये किमतीचा 638 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, एका तस्कराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. Thane Police Latest News

खासगी खबऱ्याने दिली ‘टिप’

मालमत्ता कक्षाचे पोलीस हवालदार जयकर जाधव यांना एका खासगी खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या सीमेवरून एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून मोठ्या प्रमाणात गांजाची खेप ठाण्यात येणार आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने 30 डिसेंबर रोजी सायंकाळी खारेगाव टोलनाक्याजवळ सापळा रचला.

2 कोटी 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कळव्याच्या दिशेने जाणारी संशयास्पद इनोव्हा कार (क्र. AP-09-BF-9382) पोलिसांना दिसताच तिला अडवण्यात आले. कारची झडती घेतली असता, पोलिसांनाही धक्का बसला. कारमध्ये 638 किलो वजनाचा उच्च प्रतीचा गांजा साठवून ठेवण्यात आला होता. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 2 कोटी 4 लाख 16 हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी गांजासह 10 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 2 कोटी 14 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तमिळनाडू-तेलंगणा कनेक्शन

या प्रकरणी चिन्ना टागुर लक्ष्मण नायक (वय 36, रा. तेलंगणा) याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ही अंमली पदार्थांची खेप ओडिसा व तेलंगणा राज्यातून मुंबई आणि आसपासच्या उपनगरांत वितरीत करण्यासाठी आणली जात असल्याचे समोर आले आहे. कळवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पथकाचे कौतुक

ही धाडसी कारवाई अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उप-आयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे, पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे, शितल पाटील, जयकर जाधव, दिनेश कुंभारे व त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0