Uncategorized

Thane Crime News : ठाणे खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई ; लोन रिकव्हरी करणाऱ्या कॉल सेंटरवर धाड, तिघांना अटक, टार्गेट पूर्ण करण्याकरिता लोकांना देत होते शिवीगाळ

•Thane Crime News खोटे सिम कार्ड चा वापर करून लोकांना फोन रिकवरी च्या नावाखाली शिवीगाळ, कुटुंबासह नातेवाईकांनाही त्रास

ठाणे :- “तुरंत लोन लीजिए, पाच मिनिटात लोन, अशा प्रकारच्या फसवणुकीच्या ऑफर देऊन जनतेच्या लोन उपलब्ध करून रिकवरी च्या नावाखाली शिवीगाळ करून अश्लील मेसेज फोटो व्हायरल करून धमकी देऊन लोकांना त्रास देणाऱ्या कॉल सेंटरचा रिकव्हरी एजंट चा ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. रिकव्हरी एजंट टार्गेट पूर्ण करण्याकरिता लोकांना शिवीगाळ करून त्यांच्या आजूबाजूसह नातेवाईकांनाही त्रास देत होते. अशीच एक घटना ठाण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे. कोणतेही लोन न घेतांना त्यांच्यावर शिवीगाळ करून पैसे मागण्याचे धमकी सातत्याने दिले जात होती. त्या संदर्भात त्यांनी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात 504,506,509,420,34 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करून 02 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती.

कॉल सेंटरचा पर्दाफाश, रिकवरी एजंटला केले अटक
पोलिसांनी गुन्ह्यातील फिर्यादीने यांना त्यांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून फोन करून त्यांच्याशी आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलून मनाला अतिशय त्रास होईल अशा घटना घेतल्या त्याबाबत त्यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी सदर कॉल चे विश्लेषण करून सदर नंबर आहे मंगेश हरेश सुतारे (34 वर्ष) यांच्या नावावर असल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी सदर मंगेशाची चौकशी केली असता त्याच्या नावाने हा नंबर नसून त्याच्या कागदपत्राचा दुरुपयोग केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचप्रमाणे वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर्स अंधेरी पश्चिम येथील व्हीआयपी कंपनीचा प्रतिनिधी राहुल कुमार टिळकधारी दुबे (33 वर्ष), चौकशी केली असता त्याने कंपनीने दिले टार्गेट पूर्ण करण्याकरिता त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या नावावर दोन ते तीन सिम कार्ड काढत असल्याचे सांगितले. त्यापैकी एक सिम कार्ड ग्राहकांना आणि उर्वरित सिम कार्ड हा लोन रिकव्हरी करणाऱ्यांना दिल्याची कबुली त्यांनी केली. त्याचप्रमाणे एक सिमकार्ड यांनी टेली कॉल सेंटर सिटीजन भाईंदर पूर्व येथे असलेल्या कॉल सेंटरला दिल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी 3 जुलै 2024 रोजी भाईंदर येथील कॉल सेंटर छापा टाकून कॉल सेंटर चालक-मालक शुभम कालीचरण ओझा (29 वर्ष), अमित मंगला पाठक (33 वर्ष) ऑपरेटर कॉल सेंटर यांच्यावर स्माईल फायनान्स, कोटक बँक, आयडीएफसी बँक, यांच्या लोन रिकवरी करिता एग्रीमेंट करून देण्यात आले होते. फिर्यादी यांनी कोणतेही लोन कर्ज घेतलेले नसतानाही त्यांना फोन केले अर्वाच्य शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दोन्ही आरोपींना 5 जुलै रोजी अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे. पोलिसांनी कॉल सेंटरमधून 77,300 चा मुद्देमाल हस्तगत गेला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर हे करीत आहे. तसेच पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की,या कॉल सेंटरच्या कोणी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून रिकव्हरी साठी फोन केला असेल तर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असेही पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

पोलीस पथक
आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -2, गुन्हे शाखा, ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष कृती दल ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे, महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, भुषण कापडनिस,श्रीकृष्ण गोरे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे,संजय बाबर, पोलीस हवालदार सचिन शिंपी, संदीप भोसले, आशिष ठाकुर,संजय राठोड, गणेश गुरसाळी, योगीराज कानडे, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, पोलीस नाईक भगवान हिवरे, तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस हवालदार निलेश जाधव,ढाकणे,शार्दुल यानी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0