Thane Crime News : ठाणे एसीबीची कारवाई ; मेडिकल परवाना मंजूर करण्यासाठी मागितले 30 हजारांची लाच,(औषध) सहाय्यक आयुक्तांना रंगेहाथ अटक
•Thane Bribe News मेडिकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी 30 हजारांची लाच मागणाऱ्या सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन यांना ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत बेड्या ठोकल्यात.
ठाणे :- मेडिकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी 30 हजारांची लाच मागणाऱ्या सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन यांना ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत बेड्या ठोकल्यात. डॉ दीपक राजाराम मालपुरे (57 वर्ष ,) असे या ठाणे एफडीएच्या औषध सहाय्यक आयुक्ताचे नाव आहे. एसीबीने सहाय्यक आयुक्तांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
तक्रारदार यांच्या नव्याने सुरु करत असलेल्या मेडीकल दुकानाचा परवाना मिळणेकरीता सहाय्यक आयुक्त (औषधे) (कोकण विभाग), अन्न व औषध प्रशासन, यांचे कार्यालयातील सहाय्यक आयुक्त दीपक राजाराम मालपुरे हे पन्नास हजारा रुपयांच्या लाचेच्या रक्कमेची मागणी करीन असल्याबाबत आज (28 ऑगस्ट) रोजी तक्रार प्राप्त झाली होती.
तक्रारीचा तपास घेण्याच्या अनुषंगाने आज (28 ऑगस्ट) रोजी केलेल्या पडताळणी कारवाईत दीपक मालपुरे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे मेडीकल स्टोअरचा परवाना मंजूर करण्याकरीता रुपये तीस हजारांची लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 25 हजार स्विकारण्याचे कबूल केले. एसीबीने सापळा रचून मालपुरे यांनी रक्कम 25 हजार स्विकारली असताना त्याना अन्न व औषध प्रशासन, ठाणे येथील कार्यालयान लाचेच्या रक्कमेसह एसीबीने रंगेहाथ पकडले असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सुनिल लोखंडे साो, पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय कावळे पोलीस निरीक्षक ॲन्टी करप्शन ब्यूरो, यांनी कारवाई करत लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक केली आहे.