•ठाणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता केले होते तडीपार, तडीपार आरोपीकडे पिस्टल,5 जिवंत काडतुसे सापडली
ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे.शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. तडीपार आरोपींना शहरातून हद्दी पार केले असले तरी सर्रास पोलिसांचे परवानगी न घेता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वावरत असताना दिसत आहे.अशा तडीपार गुंडास ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे तडीपार आरोपी आहेत ते विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. काल्या याला एक वर्षाकरिता ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. पोलिसांना तडीपार काल्या भेटल्यानंतर त्याच्याजवळ एक पिस्टल 5 जिवंत काडतुसे सापडली.
आरोपी गुलजार पीर मोहम्मद खान ऊर्फ राहुल काल्या (22 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, ठाणे यांनी , ठाणे जिल्ह्याच्या महसुली हद्दीतुन एक वर्षे कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 27 ऑक्टोंबर 2023 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 ठाणे यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 8 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वा. चे सुमारास, पूजा पंजाब हॉटेल जवळ, शिळ महापे रोड येथे शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पथकास मिळुन आला. तडीपार आरोपीकडे एक बेकायदेशीर पिस्टल (बंदूक) आणि 5 जिवंत काडतुसे बाळगला असताना शिळ डायघर पोलिसांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम 4
3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142,37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी हंशु झा, यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…